Supriya Pathare: मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री सुप्रिया पाठारे (Supriya Pathare) ही सध्या तिच्या लेकाच्या नव्या व्यावसायामुळे चर्चेत आहे. सुप्रिया पाठारे आणि तिचा लेक मिहीर पाठारे यांनी नवं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. या रेस्टॉरंटचं नाव महाराज फास्ट फूड कॉर्नर असं आहे. सुरुवातील मिहीर पाठारेचा महाराज नावाचा फूड ट्रक ठाण्यामध्ये होता. आता त्या फूड ट्रकचं रुपांतर रेस्टॉरंटमध्ये झालं आहे. काल या रेस्टॉरंटचं ग्रँड ओपनिंग झालं. या रेस्टॉरंट ओपनिंग कार्यक्रमाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
सुप्रिया पाठारे आणि तिचा लेक मिहीर पाठारे यांच्या नव्या रेस्टॉरंटच्या ओपनिंग कार्यक्रमाला अंशुमन विचारेनं त्याच्या कुटुंबासोबत हजेरी लावली. त्याचबरोबर अभिनेत्री हर्षदा खानविलकर देखील या रेस्टॉरंटच्या ओपनिंगला उपस्थित होती. सुप्रिया पाठारे आणि तिचा लेक मिहीर पाठारे यांच्या या महाराज फास्ट फूड कॉर्नर या रेस्टॉरंटमध्ये पाव भाजी, सोया चाप या सारखे पदार्थ खैवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. महाराज फास्ट फूड कॉर्नर हे रेस्टॉरंट देखील ठाण्यातच आहे.
काही दिवसांपूर्वी सुप्रिया पाठारेनं महाराज फास्ट फूड कॉर्नर या रेस्टॉरंटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती रेस्टॉरंटमध्ये पूजा करताना दिसत होत्या. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'महाराज पावभाजी आणि फास्ट फूड ...लवकरच तुम्हा सगळ्यांच्या भेटीला' आता सुप्रिया पाठारे आणि तिच्या लेकाच्या रेस्टॉरंटचं ओपनिंग झालं आहे.
सुप्रिया ही 'ठिपक्यांची रांगोळी' (Thipkyanchi Rangoli) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.. या मालिकेमध्ये तिनं माधवी विनायक कानिटकर (माई) ही भूमिका साकारली. तसेच मोलकरीण बाई,पुढचं पाऊल,होणार सून मी ह्या घरची या मालिकांमध्ये सुप्रियानं काम केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: