Supriya Pathare: अभिनेत्री सुप्रिया पाठारे (Supriya Pathare) ही तिच्या विनोदी शैलीनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. सुप्रिया ही सध्या 'ठिपक्यांची रांगोळी' (Thipkyanchi Rangoli) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेमध्ये ती माधवी विनायक कानिटकर (माई) ही भूमिका साकारते. सुप्रियानं विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण अनेक जणांना तिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत माहित नाहीये. जाणून घेऊयात सुप्रियाच्या स्ट्रगल स्टोरीबाबत...


एका मुलाखतीमध्ये सुप्रिया पाठारेनं सांगितलं की, 'वेदांती नावाची माझी मैत्रिण होती. ती डान्स क्लासला जायची. मलाही डान्स करायला आवडायचं. त्यावेळी 70 रुपये डान्स क्लासची फी होती. मी वेदांतीकडेच भांडी घासायचं काम केलं. ती मला 100 रुपये द्यायची. मी त्यामधील 70 डान्स क्लासला द्यायचे आणि 30 घरी द्यायचे. मी 9 वी मध्ये असताना डान्स क्लास सुरु केला होता.मला डान्स नीट जमत नव्हता. पण बाई मला शिकवायच्या. मी आणि माझी आई आम्ही दोघी मिळून 18 घरची भांडी घासायचो. त्यामुळे ते करुन डान्स करायची एनर्जी नसायची.'


पुढे सुप्रियानं सांगितलं, 'एकदा मी बाईंची अॅक्टिंग करत होते, तेव्हा बाईंनी पाहिलं.त्या बाई मला म्हणाल्या की तू छान करतेस अॅक्टिंग. तू नाटकात काम करशील का? त्यांनी मला डार्लिंग डार्लिंग नाटकात काम करण्याची संधी दिली.'






सुप्रिया पाठारेसोबच सारिका नवाथे, लीना भागवत, ज्ञानदा रामतीर्थकर आणि चेतन वडनेरे हे कलाकार ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतात.  या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचा नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, चंदूच्या येण्याने कानिटकरांच्या घरात गोंधळ झाला  आहे. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Marathi Actress: 'या' मराठमोळ्या अभिनेत्रींनी हिंदी मालिकांमध्ये केलं काम; अभिनयानं जिंकली प्रेक्षकांची मने