Snehal Rai Accident : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहल राय (Snehal Rai) सध्या चर्चेत आहे. 'इश्क का रंग सफेद' (Ishq Ka Rang Safed) या मालिकेतील स्नेहलला पुण्यात भरगाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली आहे. त्यामुळे तिच्या कारचे खूप नुकसान झाले आहे. 


स्नेहलच्या कारचं बम्पर आणि मडगार्ड पूर्णपणे खराब झालं आहे. पण ड्रायव्हरने दाखवलेल्या संयमामुळे अभिनेत्री गंभीर जखमी झालेली नाही. ती पूर्णपणे सुरक्षित आहे. ड्रायव्हरने सुरक्षितरित्या अभिनेत्रीला कारमधून बाहेर काढले. अपघातानंतर अभिनेत्रीने ट्रक ड्रायव्हरकडे भरपाई मागितली तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला आणि घटनास्थळाहून गायब झाला.






अपघातानंतर स्नेहलने जवळच्या पोलीस ठाण्यात फोन केला आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. अपघाताबद्दल माहिती देताना स्नेहल म्हणाली,"माझ्यासोबत नेमकं काय झालं हे आताही माझ्या लक्षात येत नाही. अचानक एक ट्रक आला आणि त्याने माझ्या कारला धडक दिली. माझा जीव वाचवणाऱ्या ड्रायव्हरचे खूप खूप आभार. मी लगेचच पोलिसांनी अपघाताची माहिती दिली. त्यानंतर 10 मिनिटांत ते घटनास्थळी दाखल झाले. ट्रक चालक पळून गेल्याने तक्रार दाखल केलेली नाही. 


अपघातानंतर स्नेहल घाबरली असून तिला थोडी जखम झाल्याने लगेचच ती जवळच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेली. स्नेहल राय गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमुळे चर्चेत आली होती. या मुलाखतीत ती म्हणाली होती, वयाच्या 23 व्या वर्षी मी लग्नबंधनात अडकले होते. स्नेहलच्या पतीचं नाव माधवेंद्र असून ते राजकारणी आहेत". 






स्नेहल राय छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'इश्क का रंग सफेद', 'जन्मों का बंधन', 'इच्छाप्यारी नागिन', 'परफेक्ट पती' आणि 'विश' अशा अनेक मालिकांमध्ये स्नेहलने काम केलं आहे. 'इश्क का रंग सफेद' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली आहे. 


संबंधित बातम्या


Lavanya Tripathi : कोण आहे वरुण तेजची होणारी पत्नी लावण्या त्रिपाठी? जाणून घ्या चिरंजीवीच्या सुनेबद्दल...