Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'चा  (Kon Honar Crorepati) आजचा भाग विशेष असणार आहे. या विशेष भागात ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे (Vijay Kenkre) आणि चतुरस्त्र अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) हजेरी लावणार आहेत. 'कोण होणार करोडपती'च्या निमित्ताने परेश रावल पहिल्यांदाच मराठी कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. 


ह्युमॅनिटेरिअन एड फाउंडेशन या संस्थेसाठी परेश रावल आणि विजय केंकरे 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. याआधी पार पडलेल्या 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात श्रिया आणि सचिन पिळगावकर या बाप-लेकीच्या जोडीने हजेरी लावली होती.


परेश रावल आणि विजय केंकरे बसणार हॉट सीटवर!


'कोण होणार करोडपती'च्या आजच्या भागात परेश रावल आणि विजय केंकरे एकत्र हॉट सीटवर बसणार आहेत. परेश रावल हे हिंदी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांचे आवडते अभिनेते आहेत. त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या आहेत. बाबूराव गणपतराव आपटे ही त्यांची भूमिका मराठी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. आता मराठी भाषेबद्दल असलेले त्यांचे प्रेम व अनोखे नाते प्रेक्षकांना 'कोण होणार करोडपती'च्या या विशेष भागात पाहायला मिळेल. 






परेश रावल यांच्या बरोबर मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक आणि अभिनेते विजय केंकरे हॉट सीटवर बसणार आहेत.  नाट्यकर्मी म्हणून असलेली अंगभूत ऊर्जा घेऊन, ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली 40 वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत. वेगवेगळ्या शैलींतील नाटकं प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारे विजय केंकरे यांनी नुकतेच मराठी सृष्टीतील आपले शंभरावे नाटक प्रेक्षकांच्या समोर आणले. 


'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग कुठे पाहाल? 


परेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र येऊन ह्युमॅनिटेरिअन फाउंडेशन एड या संस्थेसाठी 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. या विशेष भागात या दोघांच्या गप्पांची मैफल नक्कीच जमेल. मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी, त्या दोघांचा सिनेसृष्टीतील सुरुवातीचा काळ या सगळ्या विषयांवर या भागात गप्पा रंगल्या. प्रेक्षकांसाठी हा भाग म्हणजे पर्वणीच ठरेल. कोण होणार करोडपती'च्या खेळाबरोबरच परेश रावल आणि विजय केंकरे यांचे मनोरंजक अनुभव प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहेत.  आज रात्री 9 वाजता सोनी मराठीवर प्रेक्षक हा विशेष भाग पाहू शकतात. 


संबंधित बातम्या


Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात सचिन आणि श्रिया पिळगावकरची हजेरी; उलगडणार बाप-लेकीचे अनोखे नाते