Akanksha Puri : अभिनेत्री आकांक्षा पुरी 'स्वयंवर : मिका दी वोटी' (Swayamvar Mika Di Vohti) या रिअॅलिटी शोची विजेती ठरली आहे. या शोच्या माध्यमातून स्वत:साठी जोडीदाराच्या शोधात असलेल्या मिका सिंहने (Mika Singh) तिची जीवनसाथी म्हणून निवड केली आहे. शोमध्ये वाईल्डकार्ड स्पर्धक म्हणून आलेली आकांक्षा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. आता तिने हा शो जिंकल्याने लवकरच मिका सिंह तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. आकांक्षा पुरीने (Akanksha Puri) अंतिम फेरीत प्रांतिका दास आणि नीत महल यांना पराभूत करून मिकाच्या हृदयात स्वतःची जागा पक्की केली.


अभिनेत्री आकांक्षा पुरी व्यतिरिक्त, प्रांतिकां दास आणि नीत महल देखील 12 स्पर्धकांसह सुरू झालेल्या या शोच्या अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. सर्वांनी शोमध्ये वधूच्या पेहरावात मिका सिंहला त्यांच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता.


आकांक्षा-मिकाची जुनी ओळख


या शोमध्ये तीनही अंतिम स्पर्धकांसाठी हळदी, मेहंदी आणि संगीत यांसारखे विधी आयोजित करण्यात आले होते. शेवटी मिकाने निर्णय घेतला आणि त्याची जिवलग मैत्रिण आकांक्षा पुरी हिची जीवनसाथी म्हणून निवड केली. जोडीदार निवडताना मिकाच्या लक्षात आले की, आकांक्षा त्याला सर्वात चांगलं आणि जवळून ओळखते. याचे एक कारण म्हणजे आकांक्षा पुरी आणि मिका सिंह यांची मैत्री खूप वर्षांपासूनची आहे. आकांक्षा पुरीची ‘स्वयंवर : मिका दी वोटी’मध्ये एन्ट्री झाली, तेव्हाच हे स्पष्ट झाले होते की, ती कदाचित हा शो जिंकेल.


... म्हणून जाणवलं प्रेम!


आकांक्षा मिकाची मैत्रीण असल्याने शोमध्ये तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. मैत्री असतानाच तिला प्रेम का नाही जाणवले का? यावर उत्तर देताना तिने सांगितले की, जेव्हा मिकाला शोमध्ये इतर मुलींसोबत पाहिले, तेव्हा तिला तिच्या प्रेमाची जाणीव झाली. त्यामुळे तिने स्वतः शोमध्ये वाईल्डकार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळेस तिने असेही म्हटले की, मिकाने तिची निवड केली नाही, तरी ती नेहमी त्याची चांगली मैत्रीण असेल.



संबंधित बातम्या 


Swayamvar Mika Di Vohti : हिना खाननं मिका सिंहच्या स्वयंवरातील स्पर्धकांना दिली ट्रेनिंग; शिकवला खास कॅट वॉक


Mika Di Vohti : मिका सिंहला 'ही' मुलगी वाटते सर्वात बेस्ट? 'स्वयंवर : मिका दी वोटी'मध्ये फराह खान घेणार मुलींची परीक्षा