Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) चाहत्यांसाठी गुडन्यूज आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिसरा सीझन संपल्यापासून प्रेक्षक चौथ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. आता कलर्स मराठीने बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा पहिला प्रोमो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 


कलर्स मराठीने "मराठी मनोरंजनाचा बिग बॉस येतोय, लवकरच...आपल्या कलर्स मराठीवर" असं म्हणत बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा प्रोमो शेअर केला आहे. बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विशाल निकम विजेता ठरला होता. आता प्रोमो आऊट झाल्याने चौथ्या पर्वात कोणते स्पर्धक असणार आणि कोण विजयी होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 


महेश मांजरेकर करणार होस्ट?


बिग बॉस मराठीचे तीन सीझन महेश मांजरेकरांनी होस्ट केले आहेत. पण आता चौथा सीझन कोण होस्ट करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. चौथा सीझन सिद्धार्थ जाधव होस्ट करणार? मांजरेकर करणार, की आणखी कोणता नवा चेहरा समोर येणार यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. 






मागील तीनही पर्वांचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी लीलया पेलले होते. गतवर्षी कर्करोगामुळे महेश मांजरेकर यांनी काही भागांमधून ब्रेक देखील घेतला होता. त्यामुळे पुढील सीझनच्या सुत्रसंचालनाची धुका ते सांभाळतील का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 


‘या’ कलाकारांना विचारणा झाल्याची चर्चा!


‘बिग बॉस मराठी 4’साठी काही कलाकारांना विचारणा झाल्याची देखील चर्चा सुरू आहे. या कलाकारांमध्ये अनिता दाते, किरण माने, अभिजीत आमकर, रुचिता जाधव, शुभांगी गोखले, निखिल चव्हाण, मृणाल दुसानीस, अक्षय केळकर यांची नावे सामील आहेत. मात्र, वाहिनीकडून अद्याप यावर कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाही.


संबंधित बातम्या


Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’चा सीझन 4 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार! पूर्व तयारीला सुरुवात


Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! चौथा सीझन लवकरच होणार सुरू