एक्स्प्लोर

नाट्यगृहात प्रेक्षकांचं वारंवार 'नॉक नॉक', सुमीत राघवननी प्रयोग थांबवला

नाशिकमधील महाकवी कालिदास रंगमंदिरात 'नॉक नॉक सेलिब्रेटी' नाटकाचा प्रयोग सुरु असताना प्रेक्षकांचे फोन वारंवार वाजल्याने अभिनेते सुमीत राघवन यांनी चिडून नाटक बंद केलं.

मुंबई : मोबाईलमुळे नाटकाच्या प्रयोगात येणाऱ्या व्यत्ययाबाबत प्रसिद्ध अभिनेते सुमीत राघवन यांनी संताप व्यक्त केला आहे. 'नॉक नॉक सेलिब्रेटी' या नाटकाच्या प्रयोगदरम्यान अनेकांचे मोबाईल वारंवार वाजल्यामुळे सुमीत यांनी प्रयोग थांबवला होता. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सुमीत राघवन यांनी आपल्या रागाला वाट मोकळी करुन दिली आहे. काय घडलं होतं? नाशिकमधील महाकवी कालिदास रंगमंदिरात 'नॉक नॉक सेलिब्रेटी' नाटकाचा प्रयोग सुरु होता. वेगवेगळ्या प्रेक्षकांचा मोबाईल त्या प्रयोगाला वाजला होता. एक व्यक्ती दरवाजा उघडून प्रेक्षागृहातून आत-बाहेर करत असताना दार दरवेळी आदळत होतं आणि मोठा आवाज येत होता. एक वयस्कर बाई दुसऱ्या बाईला 'अहो हळू बोला' असं म्हणाल्यावर‌ ती बाई दाराबाहेर जाऊन बोलू लागली, मात्र ते बोलणंही स्टेजवर एकू येत होतं. शेवटी पहिल्या रांगेतील एका प्रेक्षकाचा फोन वाजला आणि सुमीत यांनी चिडून नाटक बंद केलं. यापूर्वीही हाच अनुभव नाशिकमध्येच 'एक शून्य तीन' नाटकाचा प्रयोग सुरु होता, तेव्हा एका प्रेक्षकाचा फोन वाजला. तो फोनवर बोलू लागला. मी आणि स्वानंदी टिकेकर स्टेजवर होतो. मी प्रयोग थांबवून त्या व्यक्तीकडे बघितलं तर त्याने हाताच्या इशाऱ्याने 'तुमचं चालू द्या' असं केलं आणि मी स्तब्ध झालो, असं सुमीत राघवन यांनी सांगितलं. तिकीट काढलं म्हणजे तुम्ही विकत घेतलं का आम्हाला? का म्हणून करावं‌ आम्ही नाटक? हा अपमान करुन घेण्याकरता? म्हणजे एकीकडे नाट्यगृहांची दुरावस्था आहेच, तशा बकाल नाट्यगृहात काम करा, वर आता प्रेक्षकांकडून अप्रत्यक्षरित्या असा अपमान सहन करा, अशा शब्दात सुमीत राघवन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यापूर्वी विक्रम गोखले, आस्ताद काळे यासारख्या नाट्य कलाकारांनीही मोठमोठ्याने वाजणारी मोबाईल रिंग, प्रेक्षकांची फोनवर बडबड यासारख्या कारणांमुळे प्रयोग थांबवले होते. नाट्यप्रयोग सादर करताना कलाकारांना एकाग्रतेची आवश्यकता असते. मात्र बेपर्वा प्रेक्षकांमुळे कलाकारांना तादात्म्य होण्यास कठीण जाते आणि पर्यायाने इतर प्रेक्षकांचाही रसभंग होतो. प्रत्येक नाट्यगृहात प्रयोग सुरु होण्यापूर्वी फोन बंद करण्याच्या सूचना दिल्या जात असूनही त्याकडे कानाडोळा होताना दिसतो.

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget