एक्स्प्लोर

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा साखरपुडा

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांनी साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मुंबईत वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये दोघांचा साखरपुडा झाला.

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या फिमेल फॅन्सच्या हृदयाचा चुराडा झाला असेल. सिद्धार्थ आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. कुटुंबीय आणि मोजक्‍या मित्रमंडळीच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा साखरपुडा झाला. सिद्धार्थ आणि मिताली यांनी साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मुंबईत वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये दोघांचा साखरपुडा झाला. सिद्धार्थ आणि मिताली लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन्स डेला सिद्धार्थने इन्स्टाग्रामवरुन आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. सिद्धार्थने मितालीला प्रपोज करतानाचा एक फोटो शेअर केला होता. 'मी तिला प्रपोज केलं आणि तिनं होकारही दिला' असं कॅप्शन सिद्धार्थने दिलं होतं. 'अग्निहोत्र' या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतून सिद्धार्थने 2008 साली टीव्ही क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर कशाला उद्याची बात, प्रेम हे यासारख्या मालिकांमध्ये तो झळकला. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा साखरपुडा 2010 मध्ये 'झेंडा' चित्रपटातून सिद्धार्थने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. बालगंधर्व, सतरंगी रे, जय जय महाराष्ट्र माझा, क्लासमेट्स, वजनदार अशा अनेक चित्रपटांतून त्याने अभिनय केला आहे. सोनाली कुलकर्णीसोबत 'गुलाबजाम' चित्रपटातील त्याची भूमिका विशेष गाजली होती. मितालीने 'उर्फी' चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने छोट्‍या पडद्‍यावर अनुबंध, फ्रेशर्स यासारख्या काही मालिका केल्या आहेत. नुकतीच ती 'महाराष्ट्राचे सुपर डान्सर्स' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Mohini Premachi Filmy Kahani: 'मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी' मालिकेत रंजक ट्विस्ट; दांडपट्टा आणि तलवारबाजीचा थरार, समीर-अनघा यांचा अनुभव
'मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी' मालिकेत रंजक ट्विस्ट; दांडपट्टा आणि तलवारबाजीचा थरार, समीर-अनघा यांचा अनुभव
Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget