मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माने 'स्पॉटबॉय' ही एन्टरटेनमेंट वेबसाईट आणि पत्रकार विकी ललवानी यांना कायदेशीर नोटीस पाठवून जाहीर माफी मागण्यास सांगितलं आहे. नुकसान भरपाई म्हणून 100 कोटी रुपये देण्याची मागणीही कपिलने केली आहे.
बदनामीकारक लेख प्रकाशित केल्याबद्दल कपिल शर्माने ही नोटीस बजावली आहे. नाईन एक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील पत्रकार विकी ललवानी यांनी स्पॉटबॉयच्या वेबसाईटवर आपल्याविषयी 'खोटे, प्रतिमा मलीन करणारे लेख' लिहिले, असं कपिलने म्हटलं आहे.
'स्पॉटबॉयवर ललवानी यांनी लेख लिहून माझ्या अशीलाची जाणूनबुजून बदनामी केली. सात दिवसांत त्यांनी बिनशर्त जाहीर माफी मागावी, यासाठी आम्ही कायदेशीर नोटीस पाठवत आहोत. तसं न केल्यास ललवानींना नागरी आणि फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल.' असं कपिलचे वकील तन्वीर निझम यांनी बजावलं.
राष्ट्रीय संरक्षण निधीमध्ये ललवानी यांनी शंभर कोटी रुपये जमा करावेत, असंही नोटीशीत म्हटलं आहे. ललवानी यांनी मात्र आपल्याला कोणतीही नोटीस आली नसल्याचा दावा केला आहे.
कपिलचे 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल', 'द कपिल शर्मा शो' आणि 'फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा' असे अनेक शो गेल्या काही काळात चर्चेत होते. सध्या प्रकृतीच्या कारणास्तव तो सुट्टीवर आहे.
माफी आणि 100 कोटींची भरपाई, कपिल शर्माची पत्रकाराला नोटीस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 May 2018 12:02 PM (IST)
कपिल शर्माने 'स्पॉटबॉय' ही एन्टरटेनमेंट वेबसाईट आणि पत्रकार विकी ललवानी यांना कायदेशीर नोटीस पाठवून जाहीर माफी मागण्याची आणि नुकसान भरपाई म्हणून 100 कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -