एक्स्प्लोर

भारत गणेशपुरे पुन्हा बोहल्यावर चढणार!

'चला हवा येऊ द्या'मधील श्रेया बुगडेने भारत गणेशपुरे पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याचा फोटो शेअर केला आणि गणेशपुरे यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली.

मुंबई : आपल्या महाराष्ट्राचे लाडके सरपंच...जगभर हास्याची हवा करुन आलेले, विदर्भाचे ब्रॅंड अॅम्बेसेडर भारत गणेशपुरे यांचं आज लग्न आहे. काय म्हणताय भारतचं लग्न झालंय? 18 वर्षांपूर्वी? मग भारत आता कोणाशी लग्न करत आहेत? 'चला हवा येऊ द्या'मधील श्रेया बुगडेने भारत गणेशपुरे पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याचा फोटो शेअर केला आणि गणेशपुरे यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. भारत कोणाशी लग्न करणार, वधू कोण याबद्दल तर्क लढवण्याआधीच स्पष्ट करतो, ते आपल्या पत्नीसोबतच पुन्हा लगीनगाठ बांधणार आहे, बरं का.. भारत गणेशपुरे पुन्हा बोहल्यावर चढणार! त्याचं झालं असं की, 'चला हवा येऊ द्या'ची सगळी टीम जगप्रवासाला निघाली. सगळं आलबेल असताना भारत गणेशपुरे यांना सौम्य अटॅक येऊन गेला. भारत यांचा ज्योतिषशास्त्रावर फार विश्वास आहे. त्यांनी तातडीने हात दाखवला. तर गुरुजी म्हणाले, 'तुमची लगीन गाठ अंमळ सैल होतेय की काय अस वाटतं, घट्ट करा. झालं, भारत मायदेशात परतले आणि थेट मुहूर्त काढला. अहो कधीचा म्हणून काय विचारताय..आजचा. होय. तब्बल 18 वर्षांनी भारत आपल्या पत्नीसोबत पुन्हा विवाहबद्ध होत आहेत. वहिनी अमरावतीच्याच आहेत. आता संपूर्ण लग्नविधी पुन्हा होणार आहेत, म्हणूनच कालच या दाम्पत्याची हळद झाली. श्रेया बुगडेने फोटोही शेअर केला. आज सायंकाळी भारत आणि आपल्या वहिनीची गाठ अधिक घट्ट होणार आहे. एकदा लग्न झालं की भारत पुन्हा जगप्रवासाला निघतील हे ओघाने आलंच. हं...पण आता यावेळी 'चला हवा येऊ द्या'च्या टीमला एक तिकीट एक्स्ट्रा बुक करायला लागेल हे तुम्हाला काय आम्ही सांगायला हवं काय?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार

Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला

GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला

Embed widget