Abhijeet Sawant :  बिग बॉस मराठीचं (Bigg Boss Marathi Season 5) पाचवं पर्व आता संपलं असल्यामुळे घरातील अनेक गोष्टींचा उलगडा सध्या स्पर्धकांकडून केला जातोय. सूरज चव्हाण (Suraj Chavan) हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे. तसेच अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) हा या पर्वाचा रनर अप ठरलाय. पण घरात शेवटच्या दिवसांत वातावरण कसं होतं याविषयी अभिजीतने भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे अभिजीतने अंकिता आणि धनंजयवर नाराजीही व्यक्त केली आहे. 


बिग बॉसच्या घरात शेवटच्या टप्प्यात निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे सदस्य होते. पण त्यावेळी अंकिता-डीपी आणि अभिजीतमध्ये बरेच मतभेद आणि भांडणं झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच त्याची निक्कीसोबतची मैत्रीही चांगली वाढत होती. या सगळ्यावर अभिजीतनेच भाष्य केलं आहे. 


आमचा ए ग्रुप तयार झाला असता...


घरातून बाहेर आल्यानंतर अभिजीतने अल्ट्रा मराठी बझला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये तू तुझा गेम बदललास.. सुरुवातीपासूनच तुझी निक्कीसोबतची मैत्री होती, पण अरबाज बाहेर पडल्यानंतर ती मैत्री जास्त दिली. त्यामुळे तिच्यासोबतची मैत्री हा तुझा गेम प्लॅन होता का? यावर अभिजीतने म्हटलं की, माझा असा गेम प्लॅन कधीच नव्हता. मी तिच्यासोबत गामविषयी कधीच बोललो नाही. पण जर बिग बॉसचा हा खेळ अजून लांबला असता तर निक्की, जान्हवी आणि मी असा आमचा एक वेगळा ग्रुप तयार झाला असता. तो आमचा ए ग्रुप तयार झाला असता... पण आम्हाला ती संधी मिळाली नाही. 


पुढे त्याने म्हटलं की, आमच्या तिघांचा तो ग्रुप जवळजवळ तयार झाला होता. आम्ही तिघेही एकत्र आलो होतो. पण तो गेम पुढे जाऊ शकलो नाही...ज्या प्रकारे डीपी आणि अंकिताला माझ्या काही गोष्टी आवडत नव्हत्या. ते माझ्याबद्दल बोलत होते, त्यामुळे मी त्यांच्यापासून लांब गेलो होतो. गोष्टी हाताबाहेर चालल्या होत्या. विचार जुळत नव्हते. ज्या प्रकारे सूरजला वागवले जात होते, तेदेखील मला चुकीचे वाटत होते.


ही बातमी वाचा : 


 स्लॉव्हेनियामध्ये दिग्दर्शित झालेला पहिला मराठी सिनेमा, महेश मांजरेकरांच्या ‘एक राधा एक मीरा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित