Aai Kuthe Kay Karte : 'स्टार प्रवाह' (Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका आता संपणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून होत्या. सुरुवातीच्या काळात टीआरपीमध्ये अव्वल असणारी ही मालिका आता बंद होणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण आता ही मालिका बंद होणार नसल्याचं समोर आलं असून मालिका आता नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेला आता तब्बल पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. कुटुंबातील वाद, रुसवे, फुगवे आणि आईवर आधारित असा संपूर्ण या मालिकेचा आशय आहे. दरम्यान सध्या ही मालिका ज्या वळणावर आहे, त्यावर प्रेक्षक देखील बरेच नाराज आहे. त्यामुळे सुरुवातीला यशाच्या शिखरावर असलेली ही मालिका आता टीआरपीच्या शर्यतीत मात्र खाली उतरत चालली असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या मालिकेबाबत मोठा निर्णय देखील घेतला आहे.
मालिकेला नाही मिळणार संध्याकाळचा मेन स्लॉट
संध्याकाळी 7.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. पण आता या मालिकेचा मेन स्लॉट काढून घेण्यात येणार आहे. आता ही मालिका थेट दुपारी प्रक्षेपित केली जाणार आहे. 18 मार्चपासून ही मालिका दुपारी 2.30 वाजता ही मालिका प्रक्षेपित होणार आहे. नुकतचं स्टार प्रवाह करुन घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता आणि या मालिकेची वेळ देखील संध्याकाळी 7.30 वाजताची आहे. त्यातच आई कुठे काय करते ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत खाली असल्यामुळे या मालिकेचा शेवट जवळ असल्याचं देखील म्हटलं जात होतं. पण आता दुपारी ही मालिका प्रदर्शित केली जाणार आहे.
नात्यांचं महत्त्व सांगणारी नवी मालिका 'घरोघरी मातीच्या चुली'
'घरोघरी मातीच्या चुली' ही नवी मालिका संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेच्या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका होय. सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे, बालकलाकार आरोही सांबरे अशी दिग्गज कलाकार मंडळी 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतून भेटीला येणार आहेत. सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने या मालिकेची निर्मिती केली असून राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.
ही बातमी वाचा :