Superhero Shaktimaan :  90 च्या दशकात  दूरदर्शनसह  मोजक्याच खासगी टीव्ही चॅनेल होते. याा काळात काही टीव्ही मालिकांनी प्रचंड लोकप्रियता मिळाली. काही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. पहिला  भारतीय सुपरहिरो मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी 'शक्तिमान'च्या (Shaktimaan) रुपाने टीव्हीवर आणला.  1997 साली सुरू झालेल्या मालिकेने टीव्हीवर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. सुरुवातीला शनिवारी आणि त्यानंतर रविवारी  ही मालिका प्रसारीत होत असे. शक्तिमान हे नाव या काळातील बच्चे कंपनीसाठीचे भावनिक नाते आहे. त्यामुळेच ही मालिका बंद झाली तेव्हा अनेकांना धक्का बसला. 


90 च्या दशकात सुपरहिट असणारा शक्तिमान हा शो लोकप्रिय होता. त्यानंतर अचानकपणे हा शो बंद झाल्यानंतर लोकांना धक्का बसला. शो सुपरहिट होता, टीआरपी देखील होता. तरीदेखील निर्मात्यांनी शो का बंद केला असा प्रश्न अनेकांना पडला. 


अचानकपणे शो का बंद झाला?


90 चा सुपरहिट शो शक्तीमान चालू असताना अचानक बंद झाला. हे का घडले हे लोकांना समजले नाही. अनेक वर्षांनंतर मुकेश खन्ना यांनी शो का बंद करावा लागला, याचे कारण सांगितले. 


मुकेश खन्ना यांनी कोरोनादरम्यान त्यांच्या यूट्यूब चॅनलवर याचे कारणच सांगितले. त्यांनी सांगितले की,'शक्तिमान सुरू झाले तेव्हा ते दूरदर्शनवर टेलिकास्ट करण्यासाठी 3 लाख रुपये दूरदर्शनच्या मालकाला देत होते. त्याला प्राइम टाइम मिळत नव्हता, त्याला मंगळवार रात्रीचा आणि शनिवारचा दिवसाचा स्लॉट मिळाला.


मुकेश खन्ना पुढे म्हणाले, 'मी हा शो मुलांसाठी बनवला होता आणि त्यांनी तो पाहिला नाही तर काही अर्थ नव्हता. मुले शनिवारी शाळेत असतात आणि शाळेच्या आठवड्यात लवकर झोपतात. अशा परिस्थितीत मला कार्यक्रमाचा स्लॉट रविवारी दुपारी 12 वाजताचा असावा असे वाटत होते कारण त्यावेळी मुले घरी असतात आणि ते आरामात पाहू शकतात. पूर्वी माझा शो या स्लॉटवर चालायचा पण त्याची लोकप्रियता वाढल्यानंतर दूरदर्शनच्या मालकाने भाडे वाढवले ​​आणि 7 लाख रुपयांची मागणी केली. मी तेही दिले पण काही वेळाने त्यांनी 10 लाखांची मागणी केली आणि मला ते करता आले नाही. यामुळे मला हा शो बंद करावा लागला असल्याचे मुकेश खन्ना यांनी सांगितले. 


केव्हा सुरू झाला होता शक्तिमान?


6 सप्टेंबर 1997 रोजी डीडी नॅशनल वाहिनीवर शक्तिमान मालिकेचा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला होता. हा शो इतका पॉप्युलर  झाला की लहान मुले शक्तिमान सारखा उंच उडण्याचा प्रयत्न  करत होते. त्यानंतर, मुकेश खन्ना शक्तिमान एपिसोडच्या शेवटी मुलांना संदेश देऊ लागले. शक्तिमानची संकल्पना घेऊन मुकेश खन्ना यांनी अनेक निर्माते, प्रोडक्शन हाऊसचे उंबरठे झिजवले.अखेर हताश झालेल्या मुकेश खन्ना यांनीच मालिकेची निर्मिती केली. 


 इतर संबंधित बातम्या :