Aai Kuthe Kay Karte Milind Gawali Post : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील कथानकासह कलाकारांनादेखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी सोशल मीडियावर वेळेचं महत्त्व सांगणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 


मिलिंद गवळी यांची पोस्ट काय आहे? (Milind Gawali Post)


मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे,"वेळ कोणासाठी थांबत नाही आणि असं म्हणतात की वेळेतच सगळं व्हायला हवं, एकदा का वेळ निघून गेली की मग तुम्हाला काहीही करता येत नाही आणि दुर्दैव असं आहे की, खूप कमी लोकांना वेळेचं महत्त्व आहे. बऱ्याच लोकांना स्वत:च्या तर नाहीच पण दुसऱ्याच्या वेळेची अजिबात किंमत नसते. खरंतर वेळ पाळणे आणि शिस्त हा वेगळा विषय आहे. याबद्दल नंतर लिहेल. पण आज ग्रेसफुली जगणं म्हणजे काय? याविषयी थोडं बोलावसं वाटतं". 


मिलिंद गवळी यांनी पुढे लिहिलं आहे,"खूप लोकांना असं वाटतं की आपल्याकडे खूप वेळ आहे. पण खरंतर खूप वेळ कोणाकडेच नसतो. प्रत्येकाची वेळ ठरलेली असते. एक कलाकार म्हणून मी ज्यावेळेला माझ्या क्षेत्रातल्या काही लोकांकडे बघतो आणि मला त्या लोकांचं खूप कौतुक वाटतं. त्यांच्याकडे बघून छान वाटतं. आपण पण त्यांच्यासारखं व्हायला हवं किंवा त्यांचे काही गुण आपण घ्यायला हवेत असं सतत वाटत असतं". 






केरळचे अभिनेते मोहनलाल यांचं कौतुक करत मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे,"केरळचे मोहनलाल यांच्याबरोबर मी केलं आहे. मला हा कलाकार फार ग्रेसफुली जगतो असं वाटतं. तसंच मी प्राण साहेबांबरोबर काम केलं होतं. ज्यावेळेला त्यांच्याबरोबर सिनेमा केला त्यावेळेला त्यांचं वय होतं 85. या वयात सुद्धा ते फार ग्रेसफुल होते. मी निळू भाऊ बरोबर ज्यावेळी काम केलं तेव्हा त्यांचं वय 77-78 होतं. त्यामुळे प्रेरणा घेण्यासाठी मला दुसरीकडे कुठे बघायची गरज नाही". 


मिलिंग गवळी यांची वेळेसंदर्भातली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून या पोस्टचं कौतुक होत आहे. त्यांच्या या पोस्टवर खूप छान विचार मांडले आहेत, अप्रतिम, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे मिलिंद गवळी यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेतील त्यांचं पात्र प्रेक्षकांना आवडत नाही आणि हीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे. मिलिंद गवळी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टपणे त्यांचं मत मांडत असतात. 


संबंधित बातम्या


Milind Gawali: 'एका बापाची व्यथा...' ; आई कुठे काय करते मालिकेमधील अनिरुद्धच्या पोस्टनं वेधलं लक्ष