Aai Kuthe Kay Karte:  छोट्या पडद्यावरील  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमध्ये सध्या ईशा आणि अनिश यांच्या साखरपुड्याची बोलणी सुरु आहे. ईशा आणि अनिश यांच्या साखपुड्याबाबत आणि लग्नाबाबत बोलणी करण्यासाठी अनिशचे कुटुंब देशमुखांच्या घरी आले होते. सुरुवातीला अनिरुद्ध हा ईशा आणि अनिश यांच्या लग्नाला विरोध करत होता. पण आता त्यानं देखील ईशाला परवानगी दिली आहे. पण सध्या ईशा आणि अरुंधती यांच्यामध्ये वाद सुरु आहेत. 


आई कुठे काय करते  या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती आणि ईशा या एकमेकींसोबत साखपुड्याबाबत बोलताना दिसत आहेत.  अरुंधतीच्या मते, ईशा आणि अनिशचा साखरपूडा हा घरच्या घरीच व्हावा. तर दुसरीकडे ईशाचं म्हणणं आहे की, तिला साखपुडा हा धुमधडाक्यात करायचा आहे. यावरून  आणि अरुंधतीमध्ये वाद झाला आहे. आता साध्या पद्धतीने साखरपुडा करायला ईशा तयार होणार का? या प्रश्नाचं उत्तर  आई कुठे काय करते  या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना मिळेल.


आई कुठे काय करते या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की,  ईशाची आजी, संजना, ईशाचे आजोबा आणि अनघा हे सर्वजण ईशाला समजावत आहेत. 


पाहा प्रोमो






काही दिवसांपूर्वी केळकर कुटुंब हे देशमुखांच्या भेटीला आले होते.  यादरम्यान अनिरुद्ध आणि अनिशच्या बाबांमध्ये संवाद होतो. त्यानंतर अनिरुद्ध हा अनिशला टोमणे मारतो. अनिरुद्धचे बोलणे ऐकल्यानंतर अनिरुद्धचे बाबा हे केळकर कुटुंबाला घरात यायला सांगातात. 


'आई कुठे काय करते' मालिकेची स्टार कास्ट


'आई कुठे काय करते' या मालिकेत  मधुराणी प्रभूलकर या अरुंधती ही भूमिका साकारतात. आई कुठे काय करते मालिकेमधील त्यांच्या अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी  हे साकारतात.  तर  संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते. आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीने अनिरुद्धला करून दिली त्याच्या चुकीची जाणीव; 'आई कुठे काय करते !' मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष