Gaur Gopal Das In Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमात अनेक दिग्गज मंडळी सहभागी होत असतात. या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मोटिव्हेशनल गुरु गौर गोपाल दास (Gaur Gopal Das) हजेरी लावणार आहेत. एखादी वाईट सवय कशी सोडायची हे गौर गोपाल दास त्यांच्या शैलीत सांगणार आहेत.
गौर गोपाल दास यांचा 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विनोदवीर भाऊ कदम (Bhau Kadam) गौर गोपाल दास यांना प्रश्न विचारतो की,"मला चहाचं व्यस्न खूप आहे. ते कसं कमी करायचं?". या प्रश्नाचं उत्तर देताना गौर गोपाल दास म्हणतात की,"माझा एक मित्र एकेदिवशी मला म्हणाला की, मला सिगारेट सोडायची आहे. मी त्याला विचारलं, दररोज किती सिगारेट ओढतोस. यावर तो म्हणाला 64. त्याला मी म्हणालो की, वेडा आहेस का तू कशाला सोडायची सिगारेट? अजिबात सिगारेट सोडायची नाही".
गौर गोपाल दास पुढे म्हणाले की,"मी तिला दररोज 64 सिगारेट ओढण्याऐवजी 62 सिगारेट ओढण्याचा सल्ला दिला. 64 पासून थेट सिगारेट पूर्ण बंद करणं शक्य नाही. पण 64 च्या 62 करण शक्य आहे. दिवसाला दोनच कमी करायच्या आहेत. आठवड्याभराणे आणखी दोन कमी कर. त्यानंतर हळूहळू एक-एक कमी करत जा. अशाप्रकारे 64 सिगारेट ओढणारा आता एकही सिगारेट ओढत नाही".
गौर गोपाल दास म्हणतात की,"जेव्हा आपण आपल्या भावनांचा रिमोट लोकांच्या हाती देतो तेव्हा आपलंच नुकसान होतं. आपले डोळे चांगले असतील तर आपलं जगावर प्रेम होईल. पण जीभ चांगली असेल तर जगाचं आपल्यावर प्रेम होईल".
गौर गोपाल दास यांच्यासोबत रंगणार गप्पांची मैफील
'चला हवा येऊ द्या'च्या आगामी भागात गौर गोपाल दास हजेरी लावणार आहेत. झी मराठीने नुकताच सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. यात गौर गोपाल दास यांचा विनोदी अंदाज पाहायला मिळत आहे. थुकरटवाडीत गप्पा रंगणार 'गौर गोपाल दास' यांच्यासोबत, असं म्हणत झी मराठीने हा प्रोमो शेअर केला आहे. हा विशेष भाग प्रेक्षकांना येत्या सोमवारी 1 मेला रात्री 9.30 वाजता पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या