Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका पुन्हा एकदा रोमॅंटिक वळणावर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत ईशाच्या सारखपुड्याचं नाट्य सुरू आहे. तर दुसरीकडे संजनाच्या वागणुकीमुळे मालिका थोडी रटाळ होऊ लागली आहे. पण आता मालिकेत पुन्हा एकदा रंजक वळण येणार आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागात अरुंधती प्रेमाची कबुली देताना दिसणार आहे. ईशाच्या साखरपुड्याच्या गोंधळात अरुंधती आशुतोषवरच्या प्रेमाची कबुली देणार आहे. ते तीन शब्द ऐकल्यानंतर आशुतोषचा चेहरा खुलणार आहे. त्यांचा आनंद गगनात मावेनासा होणार आहे. प्रेक्षकदेखील हा विशेष भाग पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
अरुंधती आणि आशुतोषमधील दुरावा संपला
'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती आणि आशुतोषमधील दुरावा संपत चालला आहे. आशुतोष अरुंधतीची एखाद्या लहान मुलीसारखी काळजी घेत आहे. तिला खूप जपतो आहे. तिला हवी असलेली प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न करत आहे. आशुतोषच्या प्रेमामुळे अरुंधतीदेखील सुखात आहे. अरुंधतीचं हे हसरं रुप प्रेक्षकांनादेखील आवडत आहे. त्यामुळे आता मालिकेच्या आगामी भागात आणखी काय पाहायला मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
ईशा-अनिशची लगीनघाई...
'आई कुठे काय करते' मालिकेत ईशा आणि अनिशची लगीनघाई पाहायला मिळत आहे. आप्पा आणि कांचनताई केळकरांच्या घरी जाऊन ईशा-अनिशच्या साखरपुड्याची तारीख ठरवणार आहेत. ईशा-अनिशची पत्रिका जुळते का ते पाहिलं जाणर आहे. ईशा आणि अनिशचं एकमेकांवर प्रेम असेल तर त्यांचं नातं टिकेल, त्यांचं नातं टिकवण्यासाठी त्यांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत. असं सुलेखा ताईंच मत आहे. त्यामुळे ईशा आणि अनिशचा साखपुडा लवकरच पार पडणार आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेत मधुराणी प्रभूलकर, मिलिंग गवळी, रुपाली भोसले आणि ओंकार गोवर्धन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत.
संबंधित बातम्या