Aai Kuthe Kay Karte : स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. जवळपास 5 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. त्यानंतर आता ही मालिका ऑफ एअर जाणार आहे. मालिकेच्या शेवटच्या भागाचंही शूटींग नुकतच पार पडलं आहे. त्यानंतर मालिकेतील प्रत्येक कलाकार सोशळ मीडियावरुन पोस्ट करत त्यांच्या पात्राविषयी भरभरुन बोलताना दिसत आहे.
नुकतच यश देशमुख ही भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुख यानेही पोस्ट करत भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर आता मालिकेतील विशाखा हे पात्र साकारणारी अभिनेत्री पूनम चांदोरकर हिनेही पोस्ट करत सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच तिने तिच्या मलिकेच्या टीमचे आभारही मानलेत.
'विशाखा'ची भावनिक पोस्ट चर्चेत
अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, विशाखा काळजी घे... 5 वर्ष सुरू असलेला हा प्रवास काल पूर्ण झाला .(थांबला नाही म्हणणार.. )इथून पुढे आता दुसऱ्या प्रवासाची सुरुवात...जिची कुठेही शाखा नाही अशी "विशाखा "असं गमतीमध्ये रवी सर, आप्पा बोलायचे..."आई कुठे काय करते " काल शूटिंगचा शेवटचा दिवस ...रात्री गणपती बाप्पा मोरया असे जेव्हा रवी सर बोलले तेव्हा पहिल्यांदा काहीतरी खोलवर जाणवलं .. ही packup ची घाई, हा आवाज , ही वास्तू, script, क्लोज साठी makeup touchup करून रेडी होणं ,कॉस्च्युम , तयारी आणि बरंच ...बरंच काही काळ समृद्धी बंगल्यातमध्ये थांबलं...आणि मग पहिला दिवस ते आजचा दिवस सगळं डोळ्यासमोरून येऊन गेलं...
पुढे तिने म्हटलं की, या मालिकेने , समृद्धीने कलाकार म्हणून माणूस म्हणून खरच खूप समृद्ध केलं..शेवटचं तिथे मस्त टेकवलं आणि वास्तूचा निरोप घेतला..मुग्धा गोडबोले यांच्या लेखणीतून विशाखा तयार झाली आणि मग रवी सर, सुबोध सर ,तुषार विचारे यांच्या मार्गदर्शनाने तिने आकार घेतला..अगदी कुठेही गेलं तरी विशाखा या नावाने सगळे ओळखतात..लॉकडाऊनमध्ये तर डोळे आणि आवाजावरूनही तोंडावर विशाखा आत्या ही हाक आली की समाधानाने भरून पावत होते.