Ankita Walavalkar: बिगबॉस मराठीच्या पाचव्या पर्वामधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली कोकण हार्टेड गर्ल बिगबॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही कोणत्यानं कोणत्या कारणानं चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सुरज आणि अंकिताच्या नात्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा होती. सुरजवर युट्यूबवर स्वतंत्र व्हिडिओ बनवत तिनं नाराज असल्याचं सांगितलं होतं. दुसरीकडे अंकिताला लग्नाचे वेध लागलेत. कोकण हार्टेड गर्लचा होणारा नवरा कोण यासाठी सगळेच उत्सुक होते. नंतर तिनं चाहत्यांना दसऱ्याच्या मुहुर्तावर नवऱ्याविषयी सांगितलं. आता तिची सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. अंकिता आणि कुणाल दोघे लवकरच लग्न करणार असून नवऱ्यासोबत फोटो टाकत तिनं प्री वेडिंग शुट करणं गरजेचं आहे का? असा चाहत्यांना सवाल केलाय. यावर नेटकऱ्यांनी अंकिताला भरभरून प्रतिसाद दिल्याचं दिसतंय.
अंकिताचं लग्न फेब्रुवारीत!
अंकिता वालावलकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल बिगबॉस मराठीच्या पाचव्या पर्वात झळकत घरोघरी पोहोचली. आता तिच्या लग्नाची सोशल मीडियावर सगळीकडे चर्चा आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर तिनं चाहत्यांना ती लग्न करणार असल्याचं सांगत सरप्राईज दिलं होतं. एका मुलाखतीत फेब्रुवारीत लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं.तिनं अद्याप तिच्या लग्नाची तारीख कोणालाही सांगितली नसली तरी आपल्या लग्नाविषयी अपडेट देत अंकिता चाहत्यांची उत्सुकता वाढवत असते.
प्री वेडिंगचे वेध लागले..चाहत्यांनाच विचारलं..
अंकिता वालावलकरनं नुकतीच तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत एक फोटो टाकत चाहत्यांना आणखी एक अपडेट दिली आहे. सध्या लग्नसराईचा सिझन आहे. अलिकडे प्री वेडिंग फोटोशूट करण्याचा मोठा ट्रेंड सुरु आहे. नव्या नव्या पद्धतीनं कपल प्रीवेडिंग फोटोशूट करत असतात. पण अंकितानं आता चाहत्यांनाच प्रीवेडिंग फोटोशूट करायलाच हवं का? असं विचारलंय.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीयांचा पाऊस
नेटकऱ्यांनी कॅप्शन वाचून या पोस्टवर तुफान प्रतिक्रीया दिल्या आहेत. काहींनी अंकिताला हो प्रिवेडिंग करायलाच पाहिजे असं सांगितलंय. तर काहींनी तिचा आणि कुणालचा फोटो सुंदर आल्याचंही तिला सांगितलंय. तिच्या अनेक चाहत्यांनी प्रिवेडींग करण्याचा तिला सल्ला दिलाय.एका चाहतीनं तर हे काय विचारणं झालं का..तुमच्या दोघांना एका फ्रेममध्ये बघायचं आहे.लवकरात लवकर तू प्रीवेडिंग फोटोशूट करायलाच हवंस. असं एकीनं लिहिलंय.