Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali)  यांच्या आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेमध्ये ते अनिरुद्ध ही भूमिका साकारतात. मिलिंद गवळी हे विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन आठवणींना उजाळा देत असतात. वेगवेगळे किस्से ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगतात. मिलिंद गवळी यांनी नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “वक्त से पहले “या चित्रपटाच्या काही आठवणींना उजाळा दिला.


मिलिंद गवळी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं,  'गायक नितीन मुकेश यांनी माझ्या पहिल्या चित्रपटासाठी, माझ्यासाठी पार्श्वगायन केलं होतं चित्रपटाचे नाव होतं “वक्त से पहिले”. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं गोविंद सरय्या यांनी, गोविंद सरय्या म्हणजे ज्यांनी नूतनचा golden jubilee सिनेमा सरस्वतीचंद्र दिग्दर्शित केला होता. मला त्यांनी “ वक्त से पहले “या चित्रपटासाठी नायक म्हणून निवडलं होतं, या चित्रपटाची नायिका होती जयंत सावरकर यांची कन्या सुपर्णा , या चित्रपटांत पल्लवी जोशी आणि निवेदिता सराफ सुद्धा नायिकेसाठी consider केल्या होत्या, तो काळ होता 1984 चा, सगळ्यांचीच सुरुवात होती, श्रेष्ठ गायक मुकेश यांचा चिरंजीव नितीन मुकेश याला गोविंद सर यांनी त्या गाणं गायची संधी दिली होती, “वक्त से पहले “या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्या चित्रपटांमध्ये मराठीचे दिग्गज हिरो “अरुण सरनाईक” हे सुद्धा काम करत होते. लहानपणापासून त्यांना बघत बघत आम्ही मोठे झालो होतो, त्यांनी गायलेलं “पप्पा सांगा कोणाचे मम्मी सांगा कोणाची” प्रमिला दातार आणि राणी वर्मा यांच्यासह हे गाणं अजूनही तितकच मधुर आणि फ्रेश nostalgic वाटतं.'






पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं,  'काल  तेजाबमधलं नितीन मुकेश यांचं गाणं कानावर पडलं, आणि “ वक्त से पहले “से दिवस आठवले, नितीन मुकेश आठवला , अरुण सरनाईक आठवले ,गोविंद सरय्या आठवले. अरुण सरनाईकांचे 16 जून 1984 चे त्यांचे ते शब्द आठवले की “राजा पुढच्या आठवड्यात कोल्हापूर वरून मुंबईत येणार आहे तेव्हा मी तुझ्या घरी नक्की येतो " आणि 21 जून 1984 ला पंढरीची वारी शूटिंग करण्यासाठी कोल्हापूर वरून पुण्याला येत असताना त्यांच्या गाडीचा एक्सीडेंट झाला ज्यात,यांची पत्नी आणि मुलगा गेले. आणि माझ्या घरी त्यांचं येणार राहून गेला. आयुष्यामध्ये फक्त आठवणी मागे राहतात, ज्या वेळेला आपण जुनी गाणी ऐकतो , तेव्हा त्या गाण्याबरोबर अनेक आठवणी जाग्या होतात' मिलिंद गवळी यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Milind Gawali: 'एका बापाची व्यथा...' ; आई कुठे काय करते मालिकेमधील अनिरुद्धच्या पोस्टनं वेधलं लक्ष