Tejasswi Prakash : ‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) सध्या ‘नागिन 6’ या मालिकेमध्ये दिसत आहे. बिग बॉस संपल्यानंतर लगेचच तेजस्वीने ‘नागिन 6’च्या शूटिंगला सुरुवात केली होती. बिग बॉस दरम्यान तेजस्वीला या नव्या मालिकेची ऑफर देण्यात आली होती. बिग बॉस शोमध्ये असतानाच तिने नागिनचा प्रोमो शूट केला होता. शोमधील तेजस्वीचा लूक सर्वांची मनं जिंकत आहे. बिग बॉसच्या घरात तेजस्वीने वजन कमी केले होते. आता त्याचाच फायदा तिला ‘नागिन 3’ या शोमध्ये मिळत आहे. तेजस्वीने स्वतः आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितले.

Continues below advertisement


तेजस्वीने एका मुलाखतीत सांगितले होते की, बिग बॉसच्या घरामध्ये वजन कमी केल्यामुळे तिला ‘नागिन 6’मध्ये आकर्षक लूक मिळाला होता. तेजस्वीने सांगितले की, शोमध्ये माझ्यासोबत घडलेल्या प्रकारांमुळे मी जेवण देखील जेवू शकले नाही. मी या घरात खूप वजन कमी केले आणि त्यानंतर मला नागिनची ऑफर आली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागिनसाठी योग्य लूक असणे आवश्यक होते. मी त्या लूकमध्ये फिट झाल्याचा मला आनंद आहे. कारण माझे वजन कमी झाले आहे आणि लोकांना माझे कामही आवडत आहे.



आजवरच्या प्रवासावर खुश तेजस्वी!


पुढे तेजस्वी प्रकाश म्हणाली की, मी गेली अनेक वर्षे काम करून खूप आनंदी आहे. कारण या अनुभवामुळे मला इथपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे. तेजस्वी पुढे म्हणाली की, माझा शेवटचा शो ‘पेहरेदार पिया की’ वादाचा भाग बनला होता. त्यामुळे मी प्रेक्षकांशी संपर्क साधू शकले नाही. त्या शोमुळेच मी ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘नागिन 6’मध्ये प्रवेश करू शकले.


आजकाल तेजस्वी तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेचा भाग बनली आहे. ती अभिनेता करण कुंद्राला डेट करत आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले जाते. दोघांचे व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत आहेत.


हेही वाचा :