मुंबई : टाटा समूहातील एक असलेल्या तनिष्ककडून महिलांसाठी नव्या इयररिंग्जचा खजिना आणण्यात आला आहे. ज्यात सर्वात मोठी आणिनवी श्रेणी ‘स्टनिंग एवरी इयर’ असं नाव देण्यात आलं आहे. मंगळवारी अभिनेत्री आणि शाहिद कपूरची पत्नी मिरा राजपूत हिच्या हस्ते महिलांसाठी ह्या नवीन डिझाईन आणि विविध प्रकारचे इअररिंग्ज म्हणजेच कानातले बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत. 


तनिष्क नेहमीच इअर रिंग्जबाबत महिलांना विविध प्रकारच्या माध्यमातून आकर्षित करत असते. अशातच महिलांसाठी काही वेगळंआणि आकर्षक असे आणण्याचा प्रयत्न तनिष्ककडून यावेळी देखील करण्यात आला आहे. 


नेहमीच भारतीय बाजारपेठेतील महिलांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्याव्हेरायटीज् आणि डिझाईन बाजारपेठात आणत असते. अशातच वेळोवेळी वेगवेगळ्या ईव्हेंटसाठी विविध प्रकारचे इअररिंग्ज बाजारातआणण्याचा प्रयत्न तनिष्ककडून करण्यात येत असल्याचं टायटन कंपनी अंतर्गत येणाऱ्या तनिष्कच्या जनरल मॅनेजर (मार्केटिंग) रंजनी कृष्णस्वामी यांनी सांगितलं. 


भारतात तनिष्कचे 360 आउटलेट्स आहेत. ज्यात सर्वात मोठ्या 16 फॉर्म्स आणि 29 कॅटॅगिरीत दोन हजारपेक्षा जास्त इअररिंग्ज बघायला मिळतात.  सोना, डायमंड आणि प्लॅटेनियमपासून बनवलेले हे इयररिंग्जचे डिझाईन दररोज घालण्याकरिता, लग्न, समारंभ आणि प्रत्येक उत्सवासाठी अनुरुप असे बनवण्यात आले आहेत. जे तुम्ही कधी आणि कुठे देखील घालू शकणार आहात.  वेगवेगळ्या उत्सवासाठी वेगवेगळे प्रकारचे इयररिंग्ज देखील तनिष्कने उपलब्ध करुन दिले आहेत. 


अभिनेत्री मीरा कपूर म्हणाली, ‘तनिष्कचे इयररिंग्ज नेहमीच माझ्या पसंतीस उतरतात. माझ्या आयुष्यातील खास क्षणांना आठवणीत कैद करण्यासाठी ह्या ब्रँडची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. मला ह्या ‘स्टनिंग एवरी इयर’ सोहळ्याला उपस्थित राहून अधिक आनंद होतो आहे. ह्या कलेक्शनमध्ये विविधता, सुंदरता आणि आकर्षकता आहे. त्यामुळे मला विश्वास आहे हे इयररिंग्जप्रत्येक भारतीयांच्या पसंतीस उतरेल.’ 


 महत्त्वाच्या बातम्या: