Salman Khan To Shelve Kabhi Eid Kabhi Diwali: 'राधे'  (Radhe) चित्रपटानंतर सलमान खानचे (Salman Khan) दोन बिग बजेट चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत. एक आयुष शर्मा स्टारर 'अंतिम' (Antim) आणि दुसरा 'टायगर 3' (Tiger 3). त्याचबरोबर मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानचा 'कभी ईद कभी दिवाळी' हा चित्रपट आता बनवला जाणार नाही. अशा बातम्या आल्या होत्या की चित्रपटाच्या निर्मात्यांना शीर्षक बदलयाचं होतं. मात्र, आता या चित्रपट निमितीच्या आशा धुसर झाल्या आहेत. दरम्यान, सलमान खान 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) या रिअॅलिटी शोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.






Radhe Failure Shakes Him Up Like Zero Did To SRK: मीडिया रिपोर्ट्स नुसार, 'कभी ईद कभी दिवाळी'चे गाशा गुंडाळण्यामागचे कारण 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'चे बॉक्स ऑफिसचे खराब प्रदर्शन सांगितले जात आहे. सलमान खानने जरी या चित्रपटाचे खूप कौतुक केले असले तरी सर्वांनाच माहित आहे की हा चित्रपट खूप आपटला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'राधे'ला लोकांच्या मिळालेल्या प्रतिक्रियामुळे सलमानला तितकाच धक्का बसला आहे जितका 'झिरो'च्या अपयशाने शाहरुख खानला आश्चर्य वाटले. त्याचबरोबर सलमानला दुसरा प्रकल्प सुरू करण्याची घाई नाही. कदाचित 2022 मध्ये 'अंतिम' हा सलमानचा एकमेव चित्रपट रिलीज होणार आहे. त्यानंतर 'टायगर 3' 2023 मध्ये रिलीज होईल.






Antim Relese in Zee5: दरम्यान, सलमान खान 'राधे' सारखाट 'अंतिम' रिलीज करण्याची आशा करत आहे. हा चित्रपट Zee5 वर डिजिटल रिलीजसह दोन सिंगल स्क्रीनवर रिलीज होईल. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान आयुष शर्माला 'अंतिम' चित्रपटातून पुन्हा लॉन्च करत आहे. सलमान खानचा चित्रपट 'कभी ईद कभी दिवाळी' पुढे ढकलण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 'अंतिम' आणि 'टायगर 3' व्यतिरिक्त, सुपरस्टारने आतापर्यंत कोणत्याही नवीन प्रकल्पावर स्वाक्षरी केलेली नाही.