एक्स्प्लोर

Tanishaa Mukerji on Power Cut: घरातील वीज कापली, अभिनेत्री काजोलची बहीण संतापली; थेट अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना ट्विट टॅग करत म्हणाली...

Tanishaa Mukerji on Power Cut: तनिषा मुखर्जीने वीज खंडीत केल्याबद्दल पोस्टद्वारे प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

Tanishaa Mukerji Power Cut: अभिनेत्री तनिषा मुखर्जी (Tanishaa Mukerji) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण सध्या चर्चेत येण्यामागचं कारण बॉलिवूड नसून, वैयक्तिक कारण आहे.  वडिलोपार्जित लोणावळ्यातील (Lonavala) घरातील विजेच्या समस्येमुळे तनिषा मुखर्जी त्रस्त झाली आहे. काजोलची बहीण तनिषा मुखर्जीने मंगळवारी सोशल मीडियावर महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या (MSEB) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तसेच आपली नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत असा आरोप केला की, तिच्या घरातील वीज कनेक्शन खंडीत करण्यात आले आहे.   तसेच मोठ्या रकमेची वीज बिल भरण्यास सांगितले आहे.  तनिषाने पोस्ट शेअर करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना टॅग केलं आहे. 

तनिषा मुखर्जीचा वीज बिलावरुन संताप (Tanishaa Mukerji Claims Power Cut at Lonavala Home)

तनिषा मुखर्जीने लोणावळ्यातील वीज विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे.  तिने आपल्या पोस्टद्वारे वीज विभागाकडून अधिक रकमेची वीज बिले पाठवली जात असल्याचा आरोप केला असून, वीज बिल भरण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं तिने म्हटलं आहे.  'महाराष्ट्र राज्य वीज मंडळ माफियासारखे वागत आहे! ते मोठ्या रकमेची वीज बिले पाठवत आहेत आणि वीज कापून पैसे भरण्यासाठी दबाव टाकत आहेत. हा निव्वळ गुन्हा आहे!', असं तिने म्हटलं आहे.  अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये दावा केला की, तिच्या लोणावळ्यातील घरातील वीज कनेक्शन शनिवारी खंडित करण्यात आली आहे.  अंतिम मुदत आली नसतानाही ही कारवाई करण्यात आली आहे, असं तिने म्हटलं आहे. तसेच अभिनेत्रीने वीज विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईला चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. 

आपल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर संबंधित  व्यक्तींना टॅग केले आहे. तसेच लोणावळ्यातील वीज व्यवस्थेकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यासह तिने टाटा पॉवरलाही टॅग केलं आहे.  अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सोशल मीडियातील काही युझर्सनेही तिच्या पोस्टवर कमेंट करुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत.   एकाने कमेंटमध्ये, 'वीज बिल थकले आहे, तर बिल भरण्यासाठी अंतिम मुदतपर्यंत का थांबावे?', असं सवाल उपस्थित केला आहे. या कमेंटचं उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, 'अंतिम मुदतीपर्यंत का थांबली? हा मुळात प्रश्न नाही.  वीज खंडीत होण्याबद्दल आणि पडताळणी न अवाजवी बिल भरण्यासाठी दबाव आणला जात आहे', याबद्दल तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याचं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मला अभिनेत्री कंगनाची आठवण येते, पण आता ती फक्त चेष्टा...'; फिल्म क्रिटिकचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले 'तिला राजकारण...'

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! एका व्यक्तीला घेतलं ताब्यात, जुहू पोलिसांची मोठी कारवाई
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! एका व्यक्तीला घेतलं ताब्यात, जुहू पोलिसांची मोठी कारवाई
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Advertisement

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget