एक्स्प्लोर

Taapsee Pannu Kiara Advani: 'अशा प्रकारचे सिनेमा करण्यापेक्षा मी संन्यास...'; तापसी पन्नूचा रोख कुणावर? कियारा अडवाणीला टोमणा?

Taapsee Pannu Kiara Advani: तापसी पन्नूने पॉडकास्टमधून कोणत्या अभिनेत्रीवर धरला रोख?

Taapsee Pannu Kiara Advani Toxic: तापसी पन्नू (Taapsee) सध्या 'गांधारी' (Gandhari) या बहुचर्चित सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातून तापसी पन्नू  एक वेगळीच कथा प्रेक्षकांच्या समोर येऊन सादर करणार आहे.  यात तिची भूमिका वेगळी आणि दमदार असणार आहे.  कधी न पाहिलेल्या भूमिकेत तापसी पन्नू दिसणार असल्यामुळे चाहते या सिनेमासाठी उत्सुक आहेत.  तापसी पन्नू सध्या आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी चर्चेत असते. खासदार - अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि तापसी पन्नू यांच्यातील वाद मध्यंतरी चर्चेत आला होता. अलिकडेच अभिनेत्रीने सिनेमातील बदलांविषयी भाष्य केलं आहे.  तिच्या मते, 2015 पासून थिएटर रिलीजमध्ये बराच बदल पाहायला मिळत आहे. 

तापसी पन्नूचा कियारा अडवाणीला अप्रत्यक्ष टोमणा? (Taapsee Pannu Says She would Rather Retire Than Do Certain)

तापसीचं असं म्हणणं आहे की, जेव्हा सिनेसृष्टीत विविध प्रकारचे, जॉनरचे चित्रपट तयार  करण्यात येत होते,  तेव्हा सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केल्यामुळे ती स्वत:ला खूप भाग्यवान समजते.  अलिकडेच तापसी पन्नूने सुचिन मेहरोत्रा (Suchin Mehrotra) याच्या पॉडकास्टला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने, गेल्या काही महिन्यांत प्रदर्शित झालेले चित्रपट पाहिल्यानंतर तिने आपल्या कुटुंबासोबत सिनेसृष्टीच्या सद्यस्थितीवर चर्चा केली. तिने या मुलाखतीत गंमतीने म्हटलं की, 'मला असं वाटतं की आता रिटायर घेण्याची वेळ आली आहे'.    

तापसी पन्नूने मुलाखतीत स्पष्ट केलं की, 'काही विशिष्ट प्रकारचे चित्रपट करण्यापेक्षा रिटायर होणं पसंत करेल', असं तापसी पन्नू मुलाखतीत म्हणाली. तसेच अभिनेत्री हे देखील मान्य करते की,  अशा प्रकारच्या सिनेमांचे एक विशिष्ट प्रकारचे प्रेक्षक नक्कीच असू शकतात.  तापसी मुलाखतीत म्हणाली की, 'जरी माझं अभिनयावर प्रेम असलं तरी, देखील कोणत्याही प्रोजेक्ट्सवर मी डोळे बंद ठेवून विश्वास ठेवू शकत नाही.  जरी काळानुसार, ट्रेंड बदलत राहिले तरी, देखील  कलाकाराचे काम कायम लक्षात राहते', असंही तापसी पन्नू म्हणाली.  'आजपासून जरी दशकभरानंतर जेव्हा लोक चित्रपट पाहतील, तेव्हा त्यांना कलाकाराची निवड योग्यच वाटली पाहिजे', असं अभिनेत्री म्हणाली. 

दरम्यान, तापसीने आपल्या वक्तव्यात कुणाच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी,  सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी असा अंदाज बांधला की, तिने अप्रत्यक्षपणे  कियारावरच निशाणा साधला आहे.  सध्या तापसी पन्नूच्या पॉडकास्टची प्रचंड चर्चा होत आहे. तापसी पन्नूच्या गांधारी सिनेमाबाबत बोलायचं झाल्यास, तिचा आगामी सिनेमा 'गांधारी'  नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रिम होणार आहे. हा सिनेमा 3 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.   या सिनेमात तापसी पन्नूसह इश्वाक सिंह, स्वास्तिका मुखर्जी, छाया कदम यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Toxic Box Office Collection : सुपरस्टार यश अन् 4 दमदार अभिनेत्री, तरीही 'टॉक्सिक'च्या कमाईला ब्रेक; 8 दिवसांत किती कमावले?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sorab Bedi on Relationship: अभिनेत्याचे गर्लफ्रेंडसोबतचे प्रायव्हेट फोटोज व्हायरल; ट्रोलिंगनंतर अभिनेत्याचा संताप, वयाने मोठ्या गर्लफ्रेंडला करतोय डेट
अभिनेत्याचे गर्लफ्रेंडसोबतचे प्रायव्हेट फोटोज व्हायरल; ट्रोलिंगनंतर अभिनेत्याचा संताप, वयाने मोठ्या गर्लफ्रेंडला करतोय डेट
Suchitra Bandekar on Pooja Birari: 'पूजाला म्हटलं ऑडिशन देऊन बघते का? ती म्हणाली..', सुचित्रा बांदेकरांनी सांगितला ऑडिशनचा किस्सा
'पूजाला म्हटलं ऑडिशन देऊन बघते का? ती म्हणाली..', सुचित्रा बांदेकरांनी सांगितला ऑडिशनचा किस्सा
MLA Anant Singh: आमदाराच्या लेकीच्या लग्नात राडा; जेवणावरुन भांडण, ताटं हिसकावल्याचा प्रकार, प्रसिद्ध अभिनेता संतापला
आमदाराच्या लेकीच्या लग्नात राडा; जेवणावरुन भांडण, ताटं हिसकावल्याचा प्रकार, प्रसिद्ध अभिनेता संतापला
Jai Jai Swami Samarth: एका बाजूला संसार, तर दुसऱ्या बाजूला स्वामीभक्ती! रुहीसमोर मोठं संकट, स्वामी कसा दाखवणार मार्ग?
एका बाजूला संसार, तर दुसऱ्या बाजूला स्वामीभक्ती! रुहीसमोर मोठं संकट, स्वामी कसा दाखवणार मार्ग?
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation : कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय संपली इंडिया आघाडीची बैठक, शरद पवारांनी नेत्यांची मत जाणून घेतली, सूत्रांची माहिती
शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक ठोस आश्वासनाशिवाय संपली, दिल्लीत सुप्रिया सुळेंची खासदारांसोबत बैठक
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
Embed widget