Swapnil Joshi New Car : अभिनेता स्वप्नील जोशीच्या (Swapnil Joshi)अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. त्याच्या मितवा, दुनियादारी, मुंबई-पुणे- मुंबई या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्याच्या चित्रपटांमधील अभिनयामुळे तो नेहमी चर्चेत असतो. पण सध्या त्याच्या नव्या गाडीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.  नुकताच स्वप्नीलने आलिशान गाडी खरेदी केली आहे. या गाडीचे फोटो स्वप्नीलने सोशल मीडियावर शेअर केले आहे. 


स्वप्नील जोशी Jaguar I-Pace ही गाडी घेतली आहे. या गाडीचे फोटो शेअर करून स्वप्नीलने कॅप्शन दिले, 'बाप्पा मोरया. Jaguar I-Pace ही ईलेक्ट्रीक गाडी घेतली. आज मी खूप आनंदी आहे. स्वप्नीलच्या या पोस्टवर कमेंट करत त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहे. तसेच रितेश देशमुख, भरत जाधव, सुबोध भावे, सुयश टिळक, अमेय वाघ,भारती सिंह, प्रार्थना बेहरे आणि श्रेया बुगडे या कलाकारांनी स्वप्नीलच्या पोस्टवर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 


स्वप्नीलच्या नव्या गाडीची किंमत 
Jaguar I-Pace EV400 या स्वप्नीलच्या नव्या गाडीची किंमत 1.12 कोटीपेक्षा जास्त आहे, तर मुंबईमध्ये  या गाडीची किंमत ऑन-रोड किंमत कस्टमायझेशनशिवाय 1.2 कोटीपर्यंत जाऊ शकते.






स्वप्नील लवकरच बळी या त्याच्या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 9 डिसेंबर रोजी हा अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर  प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फ्युरिया यांनी केले आहे.स्वप्नीलच्या  या हॉरर चित्रपटाची वाट त्याचे चाहते उत्सुकतेने पाहात आहेत.


संबंधित बातम्या


Gadar 2 : तारा सिंह आणि सकिनाची जोडी पुन्हा येतेय, शूटिंगचे फोटो व्हायरल


Kaun Banega Crorepati: 'चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते म्हणून...'; KBC च्या मंचावर बिग बी झाले भावूक