मुंबई : ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. धोकादायक देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवली जाणार आहे.  महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा अॅक्शन प्लॅन समोर आला आहे.  परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी पाच सूत्री  अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.  


काय आहे  अॅक्शन प्लॅन?
एअरपोर्ट सीईओ कडून हाय रिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांची यादी आपात्कालीन कक्षाला पाठवली जाणार 
प्रवाशांची यादी सोपी व्हावी यासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती 
हि आपात्कालीन कक्षाकडून मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डतील वॉर रूमला प्रवाशांच्या पत्त्यासह पाठवली जाणार 
वॉर रूम मधून प्रवाशांची सतत 7 दिवस संपर्क ठेवण्यात येणार 
विलगीकरणाचे नियम प्रवासी नीट पाळत आहे की नाही यांची खबरदारी घेतली जाणार 
वॉर रूमने वॉर्डात 10 अॅम्ब्युलेंस तयार ठेवाणार 
महापालिकेची पथकही बनवली जाणार 
महापालिकेची पथक प्रवाशांच्या घरी जावून देखील तपासणी करणार 
प्रवासी राहत असलेल्या सोसायटीला पत्र दिलं जाणार 
प्रवासी विलगीकरणाचे नियम पाळतो की नाही यावर पालिकेची बारीक नजर असणार


मुंबईतील मॉल, रेस्टॉरंट, रेल्वे, सार्वजनिक वाहतूक येथे लसीचे दोन डोस असणाऱ्यांनाच प्रवेश मिळणार असल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. जर या ठिकाणी कोरोना लसीचे दोन डोस न घेतलेली व्यक्ती आढळल्यास  संबंधित संस्थांना 10 हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे.  


हाय रिस्क देशांतून 10 ते 30 नोव्हेंबर दरम्यान 3 हजार 136  प्रवासी सध्या आले आहेत. त्यातील 2 हजार 149 प्रवाशांची कोरोना चाचणी झाली आहे. तर त्याच्यांपैकी 10 प्रवासी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या सर्व प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या प्रवाशांच्या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, या सगळ्यांचा जिनोम सेक्वेंसिंगचा अहवाल दोन दिवसांत येण्याची शक्यता असून या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 



संबंधित फोटो