पती-पत्नीमध्ये वाद होणं तसं साहजिक आहे. मात्र, हा वाद कोणत्या कारणावरुन होईल याचा काही नेमं नाही असं म्हणावं लागेल. अलिकडेच बंगळुरुमधील एक घटनाही सध्या चर्चेत आहे. लॅपटॉप धुणाऱ्या पत्नीकडून पतीनं घटस्फोट मागितला आहे. दरम्यान, सध्या असाच पती-पत्नीमधील वाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. यामध्ये पती पत्नीच्या मटण खाण्याच्या सवयीमुळे पुरता त्रासला आहे. इतकंच नाही तर पतीनं पत्नीचं मटण सोडवण्यासाठी चक्क कॉलमनिस्टकडेच सल्ला मागितला आहे. यावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.


मटणावरून शाकाहारी पती आणि मांसाहारी पत्नी यांच्यात वाद झाला आहे. पती आणि पत्नीचा हा वाद थेट सोशल मीडियावर पोहोचला आहे. पत्नीनं मटण सोडण्यास नकार दिल्यानं पती कोंडीत सापडला आहे. सध्या पती आणि पत्नीचा हा वाद सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. पतीनं कॉलमनिस्टकडे आपल्या मांसाहारी पत्नीबाबत सल्ला मागितला आहे. याचं ट्वीट सध्या जोरदार व्हायरल होतं आहे.






 






 






याबाबत सांगताना शाकाहारी माणसाने कॉलममध्ये लिहीलं की, “आपण लग्न केलं तेव्हा पत्नी शाकाहारी असल्याचं वाटलं होतं. कारण तिचं संपूर्ण कुटुंब शाकाहारी आहे. नंतर पत्नीनं आपल्याला मटण खायला आवडतं असं सांगितलं. लग्नानंतर मटण खाणं सोडून देईल असं वचन पत्नीनं दिलं होतं. ती सुंदर असल्यानं या अटीवर मी तिच्याशी लग्न करण्यास तयार झालो. मात्र अजूनही ती लपूनछपून मटण खाते. तिने वचन पूर्ण केलं नसून मटण खाण्याची सवय कायम सोडलेली नाही. आता ती सांगते की, मटण खायला आवडतं आणि त्याशिवाय राहू शकत नाही. मी तिला पुन्हा एकदा माफ करण्यास तयार आहे. मी पत्नीला इशारा दिला आहे, 'नवरा हवा की मटण?' यापैकी एक निवड. मला भिती आहे की, ती मटण निवडेल ?. तुम्हांला काय वाटतं?”


पतीच्या तक्रारीनंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तर मटणाशिवाय राहणं अशक्य असल्याचं लिहीलं आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha