Kaun Banega Crorepati : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati)चे  1000 एपिसोड नुकतेच पूर्ण झाले. गेली अनेक वर्ष या  शोचे  सूत्रसंचालन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) करत आहेत. या शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन (Shweta Bachchan) आणि नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda)यांनी हजेरी लावली होती. यावेळी या शोच्या आठवणींबद्दल सांगताना बिग बी भावूक झाले. 


श्वेता बच्चन यांनी शोमध्ये अमिताभ यांना विचारले की, ‘कौन बनेगा करोडपती’  चे 1000 एपिसोड पूर्ण झाले आहेत, तुम्हाला कसे वाटत आहे? यावर अमिताभ यांनी सांगितले, '21 वर्ष झाली आहे. 2000 मध्ये मी या शोचे सूत्रसंचालन करण्यास सुरूवात केली. तेव्हा अनेक जण असे म्हणत होते की चित्रपटांमधून अमिताभ टेलिव्हीजनमध्ये जात आहेत. यामुळे त्यांच्या इमेजवर वाईट परिणाम होऊ शकतो. पण त्यावेळी मला चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते. पण नंतर जेव्हा या शोचा एपिसोड प्रदर्शित झाला. तेव्हा खूप चांगलं वाटलं. '






‘कौन बनेगा करोडपती’ मधील एपिसोडचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये या शोचा 21 वर्षांचा प्रवास दाखण्यात आला आहे. यावेळी हा प्रवास पाहताना बिग बी भावूक झालेले दिसत आहेत.  


संबंधित बातम्या


TRP Report : बड्या पडद्यावरचे सुपरस्टार छोट्या पडद्यावर फेल! अमिताभ, सलमान, रणवीरचा एकही शो टॉप टेनमध्ये नाही


Gadar 2 : तारा सिंह आणि सकिनाची जोडी पुन्हा येतेय, शूटिंगचे फोटो व्हायरल