मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. सुशांतच्या आठवणींना उजाळा देत त्याच्या मित्रांच्या वतीने एक खास ट्रिब्युट देण्यात आलं आहे. सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली देत एक गाणं 'इंसाफ ये एक सवाल आहे' हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. एकूण 4 मिनिटांच्या या गाण्यात सुशांतचे काही खास फोटो शेअर करण्यात आले आहेत. या गाण्याची निर्मिती निलोत्पल मृणाल यांनी केली आहे. जे सुशांतचे कौटुंबिक मित्र आहेत. हे गाणं वरुण जैन यांनी गायलं असून आदित्य चक्रवर्ती यांनी लिहिलं आहे. सुशांतच्या आठवणींना उजाळा देणारं हे गाणं शुभम सुंदरम यांनी कम्पोज केलं आहे.


गाण्याच्या शेवटी निलोत्पल मृणाल यांनी एक भावुक संदेश शेअरक केला आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'सुशांत सिंह राजपूत आता आपल्यात नाही. परंतु, तो नेहमीच आपल्या हृदयात असणार आहे. म त्यांचं कुटुंब, मित्र आणि फॅन्सकडून त्याला छोटीसी श्रद्धांजली देत आहे. मला आशा आहे की, तुम्हाला हे गाणं नक्की आवडेल आणि सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करेल.'



गाण्याबाबत बोलायचे झाले तर निलोत्पल म्हणाले की, 'या गाण्यामार्फत फक्त कुटुंबच्याच वतीने सुशांतला श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार नाहीये, तर सुशांतला न्याय मिळवून देण्याची गोष्टही वेगळ्या अंदाजात सांगण्यात आली आहे. सुशांतचे सर्व फॅन्सचीही सुशांतला लवकरात लवकर न्याय मिळावा हिच इच्छा आहे.'


निलोत्पल पुढे बोलताना म्हणाले की, 'या गाण्यात सुशांतचा आतापर्यंतचा प्रवास, त्याचं व्यक्तिमत्त्व, त्याच्या लहानपणापासून ते आतापर्यंतचे फोटो आणि देसभरात सुशांतला न्याय मिळवून देण्याची मागणी करणाऱ्या फॅन्सचे फोटोही शेअर करण्यात आले आहेत. लवकरच या गाण्याचा व्हिडीओही पूर्ण करण्यात येईल आणि कुटुंबाच्या वतीने श्रद्धांजली म्हणून सर्वांसमोर सादर करण्यात येईल.'


महत्त्वाच्या बातम्या :