मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. सध्या या प्रकरणी सीबीआय तपसा करत असून दरदिवशी अनेक मोठे खुलासे तपासादरम्यान समोर येत आहेत. अशात एबीपी न्यूजच्या हाती रियाचे कॉल डिटेल्स लागले आहेत. यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या एक दिवस अगोदर, सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी आणि सुशांतच्या मृत्यूच्या एका दिवसानंतरचे डिटेल्स अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. खरं तर रिया 8 जून रोजी सुशांतचं घर सोडून गेली होती. परंतु, सुशांतच्या वडीलांनी तिच्या विरोधात एफआयआर दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळल्याचं दिसत आहे.
रियाने घर सोडल्यानंतर सुशांतसोबच तिचं काहीच बोलणं झालं नव्हतं. 8 ते 14 जून दरम्यान रियाने अनेक लोकांसोबत चर्चा केल्या. रियाला फोनवर अनेक अनोळखी लोकांचे फोनही आले. तसेच सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी रियाचं एका महिलेसोबत 1 तास 7 मिनिटांपर्यंत बोलणं झालं. ज्यावेळी सगळीकडे सुशांतच्या मृत्यूची बातमी ब्रेकिंग म्हणून सुरु होती. त्यावेळी रिया मात्र फोनवर बोलत होती.
पाहा व्हिडीओ : सीबीआय तपासाची एकजुटीने मागणी करुया, सुशांतच्या बहिणीचं आवाहन
रिया आणि सुशांतचा शेवटचा फोन कॉल
रिया आणि सुशांत यांच्यात फोनवर शेवटचं बोलणं 5 जून रोजी झालं होतं. या दिवशी सुशांत आणि रिया यांच्यात दोन वेळा बोलणं झालं. पहिला कॉल सुशांतने रियाला केला होता. सुशांतने रियाला हा फोन सकाळी 8 वाजून 19 मिनिटांनी केला होता. या दरम्यान दोघांचं 1 मिनिटं 54 सेकंदांसाठी बोलणं झालं. त्यानंतर रियाच्या फोनवर HDFC बँकेच्या वतीने आणखी दोन मेसेज आले. त्यानंतर सकाळी 9 वाजून 59 मिनिटांनी रियाने सुशांतला कॉल केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यादरम्यान रिया आणि सुशांतमध्ये फक्त तीन सेकंदांसाठी बोलणं झालं. हेच बोलणं रिया
आणि सुशांतचं फोनवरील शेवटचं संभाषण ठरलं.
सुशांतच्या मृत्यूपूर्वी रात्री रियाचे पाच कॉल्स
- 13 जून 2020 रोजी रात्री रियाने रात्री 9 वाजून 43 मिनिटांनी एका AU नावाने रजिस्टर असणाऱ्या नंबरवर फोन केला होता. यादरम्यान रियाचं त्या व्यक्तीसोबत 1 मिनिटं 38 सेकंदांसाठी बोलणं झालं.
- याआधी पहिला कल रियाने रात्री 9 वाजून 21 मिनिटांनी कोणत्यातरी रुपा चड्ढा नावाच्या महिलेला केला होता. या कॉलवर रियाचं 7 मिनिटं 8 सेकंदांपर्यंत बोलणं झालं.
- याआधी त्याच दिवशी रात्री रियाचं कास्टिंग डिरेक्टर निशा चिटालियासोबत बोलणं झालं होतं. रात्री 8 वाजून 53 सेकंदांनी झालेल्या बोलण्यात जवळपास 57 सेकंद बोलणं झालं होतं.
- त्याआधी त्याच दिवशी संध्याकाळी रियाने 7 वाजून 50 मिनिटांनी रियाचं निशासोबतचं बोलणं झालं होतं. यादरम्यान दोघींमध्ये 1 मिनिटांपर्यंत बोलणं झालं होतं.
- निशासोबत झालेल्या संभाषणा दरम्यान रियाने प्रोड्यूसर-डायरेक्टर इंद्रजीत नातोजीला 8 वाजून 26 मिनिटांनी फोन केला होता. त्यावेळी जवळपास 23 मिनिटं 14 सेकंदांसाठी बोलणं झालं.
14 जून म्हणजेच, सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी रियाच्या मोबाईलवर जवळपास 7 कॉल आणि 25 मेसेज आले होते. त्या दिवशी रियाने आपल्या फोनवरून 9 कॉल केले होते.
- सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी सकाळी 7 वाजून 38 मिनिटांनी राधिका मेहता नावाच्या महिलेल्या मोबाईलवर रियाच्या मोबाईलवरून कॉल करण्यात आला होता. यादरम्यान 30 मिनिटं 55 सेकंदांपर्यंत बोलणं झालं.
- त्यानंतर लगेचच रियाने सकाळी 8 वाजून 8 सेकंदांनी राधिका मेहताला फोन केला. यावेळी दोघींमध्ये 30 मिनिटांपर्यंत बोलणं झालं.
- तिसऱ्यांदा 8 वाजून 38 मिनिटांनी पुन्हा रियाने राधिका मेहताला फोन केला आणि आता या दोघींमध्ये 5 मिनिटं 41 सेकंदांसाठी बोलणं झालं. सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी रियाने राधिका मेहता नावाच्या महिलेसोबत रियाने जवळपास 1 तास 36 सेकंदांसाठी बोलणं झालं. हिच ती व्यक्ती आहे. जिच्यासोबत रियाने सुशांतच्या मृत्यूपूर्वी 24 तासांत फोनवरून संभाषण केलं.
महत्त्वाच्या बातम्या :
अंकिता लोखंडेने व्हिडीओ शेअर करत म्हटलं "जस्टिस फॉर सुशांत"
बिहारमध्ये बनतायत रियाला यथेच्छ शिव्या घालणारी भोजपुरी गाणी
सुशांतने डायरीत लिहिला होता आपल्या भविष्याचा प्लान, डायरी एबीपी माझाच्या हाती