एक्स्प्लोर

'पोरक्या सूरजनं कुणाकडं पाहावं?' अजित दादांचं अंत्यदर्शन मिळालं नाही; 'बिग बॉस'चा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

Suraj Chavan Pays Tribute at Ajit Pawars Funeral: सूरज चव्हाण मास्क लावून रांगेत उभा राहिला. अंत्यदर्शन न मिळाल्याने जळत्या चितेला वंदन.

Suraj Chavan Pays Tribute at Ajit Pawars Funeral: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर केवळ बारामती नसून, संपूर्ण राज्य हळहळला.  28  जानेवारी  रोजी त्यांचं अपघाती निधन झालं.  आज त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. विद्या प्रतिष्ठान येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडली. त्यांना शेवटच्या निरोप देण्यासाठी जनसमुदाय उसळला होता.  साश्रु नयनांनी नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.  याच गर्दीत त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सूरज चव्हाणही बारामतीत पोहोचला. मात्र, दादांच्या लाडक्या सूरजला अंत्यदर्शन मिळालं नाही.  सूरजने काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये शेअर केला आहे.

सूरज चव्हाण अजित दादांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीमध्ये पोहोचला होता.  त्याला गर्दीत कुणी ओळखू नये, यासाठी तो तोंडाला रूमाल बांधून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पोहोचला होता. सर्वसामान्यांप्रमाणे तो रांगेत उभा होता.   दादांचं शेवटचं दर्शन व्हावं अशी त्याची इच्छा होती.  दरम्यान, लाखो लोकांची रांग काही लवकर संपली नाही. दादांची अखेरची भेट घेऊपर्यंत खूप उशीर झाला होता. सूरजला दादांची शेवटची भेट घेता आली नाही. सूरजने शेवटी चितेवर डोकं टेकावून दादांना शेवटचं वंदन केलं. 

दादांवर अंत्यसंस्कार विधी पार पडल्यानंतर सूरजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. दादांचे अंत्यदर्शन घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला, तसेच कॅप्शनद्वारे भावना व्यक्त केल्या.  त्यानं कॅप्शनमध्ये म्हटलं  की,  "आई - वडिलांनंतर मी तुमच्यात आई आप्पा पाहात होतो. तुम्ही  मला सोडून गेलात. आता पोरक्या सूरजनं नेमकं कुणाकडे पाहावं?   I MISS YOU DADA...", असं म्हणत त्यानं भावनांना वाट मोकळी करून दिली.  या व्हिडिओतून आणि कॅप्शनमधून सूरजने अजित दादांप्रति असलेल्या भावना व्यक्त केल्या. त्याची पोस्ट पाहून अनेकांना अश्रु अनावर झाले आहेत.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

सूरज चव्हाण आणि अजित दादांचं नातं अत्यंत भावनिक आणि जिव्हाळ्याचं  होतं. सूरजने बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकली. त्यानंतर अजित दादांनी त्याला बारामतीच्या मोढवे गावात हक्काचं घर बांधून दिलं. सूरजने पोस्ट समाजमाध्यमांमध्ये शेअर करून  अजित पवार यांचे मनापासून आभार मानले होते.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule On Actress Kalyani Nandkishor Pune Crime: 'गृह खात्याच्या नाकावर टिच्चून गुंड..', 'लागिरं झालं जी'फेम अभिनेत्रीसोबत घडलेल्या संतापजनक प्रकाराची सुप्रिया सुळेंकडून दखल, म्हणाल्या...
'गृह खात्याच्या नाकावर टिच्चून गुंड..', 'लागिरं झालं जी'फेम अभिनेत्रीसोबत घडलेल्या संतापजनक प्रकाराची सुप्रिया सुळेंकडून दखल, म्हणाल्या...
Kangana Ranaut on Rakhi sawant: राखी सावंतने कंगना रनौतवर साधला निशाणा; अभिनेत्री भडकली, म्हणाली, 'तिला झाडूवाल्याची नोकरीसुद्धा मिळू शकली नाही'
राखी सावंतने कंगना रनौतवर साधला निशाणा; अभिनेत्री भडकली, म्हणाली, 'तिला झाडूवाल्याची नोकरीसुद्धा मिळू शकली नाही'
Sonali Kulkarni On Aamir Khan: 'आमिर खानशी लग्न करण्यासाठी कित्येक मुली उत्सुक... त्यानं 3-4 मुलींच्या...'; साठीच्या मिस्टर परफेक्शनिस्टबाबत सोनाली कुलकर्णीचं भुवया उंचावणारं वक्तव्य
'आमिर खानशी लग्न करण्यासाठी कित्येक मुली उत्सुक... त्यानं 3-4 मुलींच्या...'; सोनाली कुलकर्णीच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
Salman Khan Wanted Look: शर्ट-पॅन्ट अन् डोक्यावर स्कार्फ; गणेशोत्सवानिमित्त सलमान खानचा नवा लूक पाहिलात का? भाईजानच्या 'वॉन्टेड' स्टाइलनं वेधलं लक्ष
शर्ट-पॅन्ट अन् डोक्यावर स्कार्फ; गणेशोत्सवानिमित्त सलमान खानचा नवा लूक पाहिलात का? भाईजानच्या 'वॉन्टेड' स्टाइलनं वेधलं लक्ष

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangali News: अभिनेत्री राजकन्या भाग्यश्रीनं बाप्पाची आरती केल्यानं वाद, गणपती पंचायतन संस्थानाचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरुन वातावरण तापलं, नेमकं घडलं काय?
अभिनेत्री राजकन्या भाग्यश्रीनं बाप्पाची आरती केल्यानं वाद, गणपती पंचायतन संस्थानाचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरुन वातावरण तापलं, नेमकं घडलं काय?
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत विशेष सुरक्षा , एक अधिकारी अन् कर्मचारी आजपासून असणार सोबत
मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत विशेष सुरक्षा , एक अधिकारी अन् कर्मचारी आजपासून असणार सोबत
Meta News : ऑनलाइन सुरक्षा सर्वोपरी, तडजोड अशक्य! केंद्राच्या दबावानंतर मेटा बालसुरक्षेबाबतच्या बाबींचा अहवाल देण्यास सहमत
सुरक्षा सर्वोपरी, तडजोड अशक्य! केंद्राच्या दबावानंतर मेटाचा मोठा निर्णय; बालसुरक्षेबाबतच्या बाबींचा अहवाल देण्यास सहमती
NSE IPO: NSE IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? सबस्क्रिप्शनपूर्वी या 5 महत्त्वाच्या गोष्टी नक्की पाहा
NSE IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? सबस्क्रिप्शनपूर्वी या 5 महत्त्वाच्या गोष्टी नक्की पाहा
Belgaum Fire Accident News: गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation : परभणीत मराठा आरक्षणासाठी‎ शेतकऱ्यानं संपवलं जीवन; शेतात गेले, झाडाला दोर बांधली अन्..., शेवटच्या चिट्ठीत लिहलं, 'जरांगे उपोषणाला बसले असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न...'
परभणीत मराठा आरक्षणासाठी‎ शेतकऱ्यानं संपवलं जीवन; शेतात गेले, झाडाला दोर बांधली अन्..., शेवटच्या चिट्ठीत लिहलं, 'जरांगे उपोषणाला बसले असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न...'
Pune Crime News: घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
Chhatrapati Sambhajinagar Accident: गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
Embed widget