ट्रेंडिंग
'कुटुंबातल्या व्यक्तीचं निधन झाल्यावर, 13 दिवस दुखवटा पाळतो...' पहलगाम हल्ल्यानंतर सुप्रीया पिळगांवकरांचा मोठा निर्णय
Supriya Pilgaonkar On Pahalgam Attack: आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत सुप्रीया पिळगांवकरांनी कश्मीर पहलगाममधल्या हल्ल्यावर संताप व्यक्त केला आहे.
Supriya Pilgaonkar On Pahalgam Attack: जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Terrorist Attack) संपूर्ण देश हादरुन गेलाय. पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कश्मीरचं सौंदर्य अनुभवण्यासाठी देशभरातून पर्यटक कश्मीरमध्ये आले होते. तब्बल 28 जणांना दहशतवाद्यांनी क्रूरपणे जीवे मारलं. जगभरातून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, बॉलिवूड सेलिब्रिटींनीही (Bollywood Celebrity) या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, अनेक मराठी अभिनेते, अभिनेत्रींनीही या घटनेवर भाष्य करत निषेध नोंदवला आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रीया पिळगांवकर (Actress Supriya Pilgaonkar) यांनी मात्र, या घटनेवर आपली प्रतिक्रिया देत एक मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.
आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत पिळगांवकर यांनी कश्मीर पहलगाममधल्या हल्ल्यावर संताप व्यक्त केला आहे. आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर, आपण 13 दिवस दुखवटा पाळतो, शोक व्यक्त करतो. मी पुढचे 13 दिवस हाताला काळी पट्टी बांधून मला मनातून किती दुःख झालं आहे, हे सांगणार आहे, असं सुप्रीया पिळगांवकर म्हणाल्या आहेत.
काय म्हणाल्या सुप्रीया पिळगांवकर?
सुप्रीया पिळगांवकर यांनी इन्स्टावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, "शो मस्ट गो ऑन. मी ही दुःखद बातमी रेडीओवर ऐकली. आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर, आपण 13 दिवस दुखवटा पाळतो, शोक व्यक्त करतो. मी आता माझा शोक व्यक्त करणार आहे. मी पुढचे 13 दिवस माझ्या हाताला काळी पट्टी बांधून मला मनातून किती दुःख झालं आहे, हे सांगणार आहे. तुम्हीही माझ्यासोबत हाताला काळी पट्टी बांधून आपला शोक व्यक्त करू शकता."
"दिखावा करतेय, असं कृपया म्हणू नका..."
सुप्रीया पिळगांवकर आपल्या पुढच्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, "मी यातून दिखावा करतेय असं कृपया म्हणून नका. या कृतीतून मला माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत. यातून मला दुःख व्यक्त करत असल्याची भावना निर्माण होत आहे." यासोबतच सुप्रिया पिळगांवकर यांनी आपल्या हाताच्या दंडाला काळी पट्टी बांधलेला फोटो देखील शेअर केला आहे.
"मी कश्मीरला जाणार..."
"मी आजवर कधीच कश्मीरला गेले नाही. पण, मी शब्द देते की, मी लवकरच कश्मीरला माझ्या कुटुंबासोबत जाणार आहे." असंही सुप्रीया पिळगांवकर म्हणाल्या आहेत. तसेच, सुप्रीया पिळगांवकर यांनी पुढे अजिबात घाबरण्याची गरज नाही, तसेच अविश्वास दाखवण्याचीही गरज नाही, असं म्हटलं आहे.