RJ Mahavash : अभिनेत्री आणि फिरकीपटू युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) कथित गर्लफ्रेंड आर जे महावश (RJ Mahavash) हिला काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. तिला डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. मात्र, आर जे महावशची (RJ Mahavash)  तब्येत अचानक बिघडली आहे. तिला पुन्हा एकदा तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याबाबतची माहिती आर जे महावशने (RJ Mahavash)  इन्स्टाग्राम स्टोरीवरुन दिली आहे. 

आर जे महावश काय काय म्हणाली? 

आर जे महावश म्हणाली, काय माहिती कोणाची नजर लागली? काल मला डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आज Emergency रुग्णालयात दाखल करावं लागलंय. डेंग्यूतून सावरलेली नाही. आता हे लिव्हरपर्यंत गेलंय.  प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा. आता हद्दच झालीये. अनेक दिवस झालेत. मला फार कमजोर झाल्यासारखं वाटतं आहे. 

धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्यात  घटस्फोट झाल्यानंतर चहल आणि महवश यांना एकत्र पाहिल्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा वाढल्या आहेत.

आर. जे. महवश कोण आहेत?

आर. जे. महवश ही एक प्रसिद्ध रेडिओ जॉकी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहेत. त्यांनी अलीकडेच 'प्यार पैसा प्रॉफिट' या वेब सिरीजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. या सिरीजच्या प्रमोशनदरम्यान, त्यांनी चहल यांना "सर्वात काळजीवाहू व्यक्ती" असे संबोधले आणि त्यांच्या स्वभावाचे कौतुक केले, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना वाव मिळाला..

युजवेंद्र चहल आणि आर. जे. महवश यांच्यातील नात्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यांच्या सार्वजनिक उपस्थिती आणि सोशल मीडिया पोस्ट्समुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा वाढल्या आहेत, परंतु दोघांनीही याबद्दल स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही. चहल आणि महवश यांना एकत्र विविध सार्वजनिक ठिकाणी पाहिल्यामुळे, त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा वाढल्या आहेत. महवश यांनी एका मुलाखतीत प्रेमात "डम्ब" असल्याचे सांगितले आणि विनोदी टिप्पणी केली, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना अधिक बळ मिळाले .  

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

April May 99: ‘थ्री इडियट्स’च्या टीमकडून ‘एप्रिल-मे 99’ ला शुभेच्छा! राजकुमार हिरानी, आर. माधवन, शर्मन जोशीसह रितेश देशमुखने शेअर केला ट्रेलर