Actress Rajeshwari Kharat : अभिनेत्री राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेहमी चर्चेत असते. राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) हिने फेसबुकवर नेहमी ठामपणे मतं मांडली आहेत. सध्या तिने फेसबुकवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. एका नेटकऱ्याने राजेश्वरीच्या फोटोवर 'शालू तू लय बदललीस लका', अशा आशयाची कमेंट केली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत नव्या दमाच्या अभिनेत्री येत आहेत, पण काही अभिनेत्री आपल्या सौंदर्यापेक्षा अधिक अभिनयाच्या सच्चेपणामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करतात. राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) ही त्यापैकीच एक अभिनेत्री आहे. सिनेक्षेत्रात कोणतीही पार्श्वभूमी नसताना राजेश्वरी खरात हिला दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी फँड्री सिनेमात संधी दिली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ती शालू म्हणूनच ओळखली जाऊ लागली.
राजेश्वरी खरात हिला खरी ओळख मिळाली ती नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ (2013) या चित्रपटामधून. या चित्रपटात राजेश्वरी खरात हिने शालूची भूमिका साकारली होती. ही एक शांत, साधी आणि उच्चवर्गीय मुलगी होती, जिच्यावर जब्या एकतर्फी प्रेम करत असतो. ही भूमिका न बोलता अभिनय दाखवण्याचं उत्तम उदाहरण होती. राजेश्वरी खरात हिचा हा नाजूक आणि वास्तवदर्शी अभिनय प्रेक्षकांना चटकन भावून गेला. फँड्रीनंतर राजेश्वरी खरातने मोठ्या भूमिका घेतलेल्या नसल्या तरी, त्या लघुपट, शॉर्ट फिल्म्स, नाटकं, आणि सामाजिक माध्यम प्रकल्पांमध्ये सक्रिय आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राजेश्वरी खरातला तिच्या धर्मावरुन ट्रोल केलं जातं आहे. खरंतरं धर्म ही वैयक्तिक बाब मात्र, राजेश्वरी खरातला तिच्या धर्मावरुन ट्रोल केलं जातं आहे. काही दिवसांपूर्वी राजेश्वरी खरातने बाप्तिस्मा हा विधी पूर्ण केला होता. त्यानंतर राजेश्वरी खरातला ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
