Super Dancer Chapter 4 : पॉर्नोग्राफिक फिल्म बनवून आणि काही अॅपवर ती पब्लिश केल्याचा ठपका ठेवत व्यावसायिक राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. शिल्पा शेट्टी सुपर डान्सर्स या रिअॅलिटी शोची परीक्षक आहे. पण पती राज कुंद्राच्या अटकेची बातमी समजताच शिल्पाने हे शुटींग अर्धवट सोडलं होतं. परंतु मीडिया रिपोर्ट नुसार शिल्पा लवकरच शो मध्ये परत दिसणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार शिल्पा शेट्टी परत अॅक्शन मोडमध्ये आली असून आजच एपिसोडचे शूटिंग सुरू केले आहे. मुंबईतील फिल्मसिटीमध्ये बनवण्यात आलेल्या शो च्या सेटवर शिल्पा चित्रीकरण करत आहे. पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने मीडियापासून दूर राहणचं पसंत केलं होतं. शिल्पाने जुलै महिन्यात अर्धवट शूटिंग सोडले होते. परंतु तब्बल एक महिन्यानंतर शिल्पा चित्रीकरण करणार आहे. मालिकेच्या निर्मात्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही सेटवर शिल्पाला खूप मिस करत आहे. हा फक्त एक शो नसून छोटा परिवार आहे. यामध्ये नृत्यदिग्दर्शक, पडद्यामागे काम करणारे लोक, स्पर्धक, परीक्षक यांचा समावेश आहे. जेव्हा कुटुंबातील एक व्यक्ती नसेल तर खूप कठीण जाते.
पुढे म्हणाले की, मी शिल्पाला मेसेज केला की ती शो मध्ये परत कधी येणार? परंतु या बाबत शिल्पाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिल्पा लवकरात लवकर शो मध्ये परत यावी अशी आमची इच्छा आहे. शिल्पाने शो सोडल्यानंतर सुपर डान्सर चॅप्टर 4 मध्ये शिल्पाच्या जागेवर करिश्मा कपूर, सोनाली बेंद्रेपासून रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा आले होते.
अॅपवरील कंटेंटबाबत शिल्पाला माहिती नव्हती
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या वक्तव्यात मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी सांगितलं की, "शिल्पानं दावा केला आहे की, 'हॉटशॉट्स' साठी तयार करण्यात आलेल्या व्हिडीओच्या कंटेंटबाबत तिला काहीच माहिती नव्हती. 'हॉटशॉट्स' हे एक मोबाईल अॅप आहे. याच अॅपवर अश्लील व्हिडीओ पब्लिश केल्याचा ठपका राज कुंद्रावर ठेवण्यात आला आहे.