मुंबई : पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता मुंबई पोलिसांकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. दिवसेंदिवस या केसचं महत्व वाढत चाललं असून रोज नवनवीन फिर्यादी किंवा तक्रारदार समोर येत आहेत. तसेच आता याप्रकरणी बॉलिवूडमधील अजून काही बडी नावं पोलिसांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा योग्यरित्या तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पॉर्न फिल्म रॅकेटचं प्रस्थ खूप मोठं आहे. तसेच या प्रकरणाचा तपास तितकाच गुंतागुंतीचा आहे. इतकच नाहीतर यामध्ये नवीन फिर्यादी आणि पीडित समोर येत आहेत. तसेच कोर्टामध्येसुद्धा केस मजबुतीनं उभी करता यावी, त्या अनुषंगाने सबळ पुरावे जमा करण्याचं काम करण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
एसआयटीमध्ये एक सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली तपास होणार असून मुंबई गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्तांची नियुक्ती या एसआयटीवर करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनच हा तपास केला जाणार असून, वरिष्ठांना या केस संदर्भात सगळी माहिती देण्याचं काम करणार आहेत. त्यांच्या मदतीसाठी पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, आणि पोलीस उप निरीक्षक दर्जाचे अधिकारी त्यांच्या टीममध्ये असणार आहेत.
पॉर्न फिल्म रॅकेट संदर्भात मुंबई पोलिसांच्या अखत्यारीत जितके गुन्हे दाखल आहेत. त्या प्रत्येक गुन्ह्याचा तपास या एसआयटीमार्फत केला जाणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा एक गुन्हा नोंदवण्यात आला होता. जो नंतर प्रॉपर्टी सेलकडे तपासासाठी वर्ग केला गेला होता. त्याचा तपाससुद्धा एसआयटीकडून केला जाणार आहे.
मालवणी पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये दिग्दर्शक अभिजित बोंबलेला अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तपाससुद्धा प्रॉपर्टी सेलकडून केला जात होता. जो आता एसआयटीकडून केला जाणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :