Viral Video : सनी लिओनीला मित्रानं दिला स्विमिंग पूलमध्ये धक्का, अभिनेत्रीने असा घेतला बदला
Sunny Leone Viral Video : सोशल मीडियावर सनी लियोनीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सनीचा मित्र तिला स्विमिंग पूलमध्ये धक्का देऊन पाडताना दिसत आहे.
Sunny Leone : अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सनी वेळोवेळी तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. हे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांचं चांगलं मनोरंजन करतात. सनीने नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर (Social Media) सनीचा हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तितकाच मजेदार आहे. सनीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हांलाही हसू येईल. या व्हायरल व्हिडीओमध्ये सनी लिओनी स्विमिंग पूलच्या किनाऱ्यांवर चालताना दिसत आहे.
View this post on Instagram
सनी लिओनी बाथ रोब घालून स्विमिंग पूलच्या किनाऱ्यानं चालताना दिसत आहे. यावेळी तिचा मित्र तिथे येतो. सनीचं मित्राकडे लक्ष नसतं. ती पाण्यात खेळण्याचा आनंद घेत असते. पण तेवढ्यात तिचा मित्र तिला धक्का मारून स्विमिंग पूलमध्ये पाडतो. यामुळे सनी मात्र स्विमिंग पूलमध्ये पडते आणि पूर्ण भिजते.
सनीचा व्हिडीओ झाला व्हायरल
सनी लिओनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'याची परतफेड लवकरच होईल, मी माझा बदला घेईन.' सनी लिओनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत 29 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या