एक्स्प्लोर

धुरंधर’ला सिंहासनावरुन खाली खेचलं! सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’ने पहिल्याच दिवशी उडवला बॉक्स ऑफिसवर धुरळा

सिनेमाला बहुतांश ठिकाणी पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळत असून, देशभक्ती आणि भावनिक मांडणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.

Border 2 Box Office Collection: सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’ने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एंट्री घेतली असून, 2025 मधील सर्वात मोठ्या हिट ठरलेल्या ‘धुरंधर’चा पहिल्या दिवसाचा रेकॉर्ड मोडला आहे. दमदार ओपनिंगमुळे ही फिल्म सध्या चांगलीच चर्चेत आहे. 2026 मधील पहिली मोठी रिलीज ठरलेली ‘बॉर्डर 2’ शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाली. रिलीजआधीपासूनच या चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष होतं. सिनेमाला बहुतांश ठिकाणी पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळत असून, देशभक्ती आणि भावनिक मांडणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. हाच भावनिक कनेक्ट चित्रपटाच्या लोकप्रियतेचं मोठं कारण ठरत आहे.

पहिल्या दिवसाची कमाई किती?

‘बॉर्डर 2’ने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येही जबरदस्त कामगिरी केली. रिलीजच्या एक दिवस आधीच तब्बल 4 लाख तिकीटांची विक्री झाली होती. पुढील 24 तासांत ही संख्या दुप्पट झाली. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या कमाईबाबत मोठे अंदाज वर्तवले जात होते.

ट्रेड वेबसाइट Sacnilk च्या अहवालानुसार, ‘बॉर्डर 2’ने पहिल्या दिवशी सुमारे 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र, अंतिम आकडे अजून समोर यायचे आहेत. या कमाईसह ‘बॉर्डर 2’ने 2025 मधील ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’चा ओपनिंग डे रेकॉर्ड मोडला आहे. ‘धुरंधर’ने पहिल्या दिवशी 28 कोटींची कमाई केली होती. विशेष म्हणजे, ‘धुरंधर’ने दुसऱ्या आठवड्यापासून बॉक्स ऑफिसवर खरा जलवा दाखवला आणि आजही 50 दिवसांनंतर थिएटरमध्ये यशस्वीपणे सुरू आहे.

ट्रेड तज्ञांच्या मते, ‘बॉर्डर 2’ची पहिल्या दिवसाची कमाई 35 ते 40 कोटींपर्यंत जाऊ शकते. नाइट शोजमध्येही सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणी थिएटर हाऊसफुल्ल दिसत आहेत. 1997 साली प्रदर्शित झालेल्या जे.पी. दत्तांच्या ‘बॉर्डर’चा हा सिक्वेल बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग करताना दिसतोय. आता या चित्रपटाला पहिल्याच वीकेंडला 100 कोटींचा टप्पा पार करता येतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बॉर्डर 2 मध्ये स्टारकास्ट काय?

‘बॉर्डर 2’मध्ये सनी देओलसोबत वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाची कथा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असून, यावेळी ऑपरेशन चंगेज खानची लढाई दाखवण्यात आली आहे. पहिल्या ‘बॉर्डर’मध्ये लोंगेवाला युद्ध दाखवण्यात आलं होतं आणि त्यातही सनी देओल प्रमुख भूमिकेत होते.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Embed widget