Suchitra Sen Birth Anniversary :  प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन (Suchitra Sen) यांनी त्यांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली. आज सुचित्रा  यांची जयंती. फार कमी वयात सुचित्रा यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये सुचित्रा यांनी काम केले. त्यांचा जन्म  1931 मध्ये बांग्लादेशमध्ये झाला. 82 व्या वर्षी सुचित्रा यांनी अखेरचा श्वास घेतला. 24 डिसेंबर 2013 रोजी सुचित्रा यांचे निधन झाले. त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी...  


सुचित्रा सेन यांचे मूळ नाव रोमा दासगुप्ता आहे. बालपणापासूच त्यांना अभिनयाची आवड होती. शाळेत असताना अनेक नाटकांमध्ये सुचित्रा यांनी काम केले. 15 व्या वर्षी सुचित्रा यांचे लग्न उद्योगपती आदिनाथ सेन यांच्या मुलासोबत म्हणजेच दीबानाथ सेन  यांच्यासोबत झाले. पण लग्नानंतर काही वर्षांनी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. 
 
सुचित्रा यांनी  'शेष कोथाय' या बंगाली भाषेतील चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पण हा चित्रपट काही कारणांमुळे रिलीज झाला नाही. त्यानंतर त्यांनी विमल रॉय यांच्या 'देवदास' या चित्रपटामध्ये काम केलं. या चित्रपटामध्ये त्यांनी पारो ही भूमिका साकारली. 1955 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटामध्ये सुचित्रा यांच्यासोबतच अभिनेता दिलीप कुमार यांनी प्रमुख भूमिका साकारली. 


दादासाहेब फाळके पुरस्कार नाकारला  
सुचित्रा सेन यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी दादा साहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात येणार होतं. पण त्यांनी या पुरस्काराला नकार दिला. कारण त्यांना पुरस्कार सोहळ्याला येऊन पुन्हा लाइमलाइटमध्ये यायचे नव्हते. त्यांनी सांगितलं होतं, 'जर मला पुरस्कार द्यायचा असेल, तर माझ्या घरी येऊन तो पुरस्कार मला द्या. मी पुरस्कार सोहळ्याला येणार नाही.'


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha