Shehnaaz Gill : बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिलचे (Shehnaaz Gill) फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. शहनाज तिच्या स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकत असते. पण सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचा शहनाज गिलला मोठा धक्का बसला होता. शहनाज नुकतीच विमानतळावर स्पॉट झाली आहे. दरम्यान तिल्या फोनच्या वॉलपेपरमध्ये चाहत्यांना सिद्धार्थ शुक्लाची झलक पाहायला मिळाली.
शहनाजच्या वॉलपेपरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वॉलपेपरमध्ये सिद्धार्थने शहनाजचा हात हातात धरलेला दिसत आहे. हा फोटो सिद्धार्थ आणि शहनाजच्या 'भुला दूंगा' या पहिल्या वहिल्या गाण्यातील आहे. 'बिग बॉस 13' नंतरचा हा त्यांचा पहिला प्रोजेक्ट होता.
बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये शहनाजने दिला सिध्दार्थच्या आठवणींना उजाळा
शहनाज आणि सिद्धार्थच्या काही आठवणी बिग बॉस 15 च्या ग्रॅंड फिनालेमध्ये दाखवण्यात आल्या. सिद्धार्थच्या मृत्यूनं संपूर्ण बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. सिद्धार्थच्या निधनानंतर काही काळ शहनाज सोशल मीडियापासून दूर राहिली. त्यानंतर ती हौसला रख या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसली. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये शहनाजने ध्दार्थच्या आठवणींना उजाळा दिला होता.
संबंधित बातम्या
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Sher Shivraj : अंगावर शहारे आणणाऱ्या 'शेर शिवराज'चे नवे पोस्टर प्रदर्शित
Rashmika Mandanna : विजय थलापतीच्या आगामी सिनेमात झळकणार नॅशनल क्रश रश्मिका मंदाना, वाढदिवशी निर्मात्यांनी केली घोषणा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha