राम लखन, ताल आणि हिरो यांसारख्या सुपर हिट हिंदी चित्रपटांनंतर आता प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांचा विजेता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मुक्ता आर्ट्स निर्मित विजेता या चित्रपटमध्ये मराठी चित्रपसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलकार दिसणार आहेत. सुबोध भावे,पुजा सावंत, प्रीतम कागणे ,सुशांत शेलार,माधव देवचक्के,मानसी कुलकर्णी , तन्वी किशोर, देवेन्द्र चौगुले, दिप्ती धोत्रे, क्रुतिका तुलसकर,आणि गौरीश शिपुरकर हे कलाकार या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. १२ मार्च 2020 रोजी रिलीज झाला होता पण कोरोना प्रादुर्भावामुळे चित्रपटाचे प्रदर्शन एकादिवसात मागे घेण्याचा निर्णय सुभाष घाई यांनी घेतला होता.
विजेता हा चित्रपट खेळाची पार्श्वभूमी असलेल्या कथानकावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये महाराष्ट्राच्या स्पोर्ट्स अकॅडेमीच्या डीन वर्षा कानविंदे (मानसी कुलकर्णी) माईंड कोच म्हणून सौमित्र देशमुख (सुबोध भावे) यांची निवड करतात. महाराष्ट्राला जिंकवून देणं हे सौमित्रचं ध्येय असते. तो सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचे आणि स्पर्धा जिंकण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम करतो. सर्वांमधील हरवलेला आत्मविश्वास कसा परत आणतो , त्यांना मनाच्या कुरुक्षेत्रावर जिंकायला कसं शिकवतो आणि हे सर्व करताना त्याच्या स्वतःच्या भूतकाळाला विसरून महाराष्ट्राला विजयपथावर कसा घेऊन जातो. हे सर्व प्रेक्षकांना 'विजेता' या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. सुबोध भावे यांना कोचच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 3 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Antim Motion Poster : सलमानने शेअर केलं 'अंतिम' चे पोस्टर, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
विजेता चित्रपटाचे लेखन अमोल शेटगे यांनी केले आसून निर्माती राहुल पुरी आणि राजू फारुकी यांनी केली आहे. तसेच या चिपटाचे छायालेखक उदयसिंह मोहिते यांनी केले आहे. चित्रपटाला संगीत रोहन रोहन यांनी दिले असून चित्रपटाचे संकलक आशिष म्हात्रे आहेत.
Dadasaheb Phalke Award: सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणार; पण, एका गोष्टीचं दुःख : रजनीकांत