Antim The Final Truth Motion Poster Release : सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (Aayush Sharma) स्टारर चित्रपट 'अंतिम : द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) सिनेमाची चाहते प्रतिक्षा करत आहेत. सलमान खानने नुकतेच त्याच्या आगामी सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे. सलमान खान 'राजवीर'च्या भूमिकेत दिसून येतो आहे. सलमानने डोक्यावर पगडी घातली आहे. त्यामुळे तो रावडी लूकमध्ये दिसून येतो आहे. सलमानचा हा आगामी सिनेमा 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर या सिनेमाचा ट्रेलर 25 ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात येणार आहे. 


Antim Release Date: आरररर खतरनाक! सलमान खानचा 'अंतिम' चित्रपट या दिवशी होणार रिलीज


सलमान खानच्या चाहत्यांसाठी सलमानचा आगामी सिनेमा म्हणजे आनंदाची बाब आहे. सलमान खान (Salman Khan) आणि त्याचा मेहुणा आयुष शर्मा (Aayush Sharma) स्टारर असलेल्या चित्रपट ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ची (Antim: The Final Truth) प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. सलमान खानने स्वत: ट्विट करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. सलमान खानने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेसोबत चित्रपटाशी संबंधित एक छोटा व्हिडीओ अपलोड केला आहे, तो व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.


Marathi Movies : बॉलिवूडच्या बड्या सिनेमांमुळे होत आहे मराठी चित्रपटांची गळचेपी


या चित्रपटात सलमान खान एका धाडसी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट अॅक्शनने भरलेला असणार आहे. अंतिम : द फायनल ट्रुथ या चित्रपटाचे दिग्दर्शन चित्रपट निर्माते आणि सलमान खानचे खूप चांगले मित्र महेश मांजरेकर यांनी केले आहे. यापूर्वी अशी बातमी होती की सलमान खानचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. पण, आता हा चित्रपट थिएटरमध्ये रीतीने रिलीज होईल अशी बातमी आहे. 'Antim: The Final Truth' हा चित्रपट 'मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.


जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार 'सूर्यवंशी'
अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी (Rohit Shetty) ने केले आहे. या सिनेमात अक्षय व्यतिरिक्त अजय देवगन (Ajay Devgn) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) देखील प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. या आधी अक्षय, अजय आणि रणवीरने चित्रपटाचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा सिनेमा 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.