Shahrukh Khan Son Name Aryan Meaning : मुलाचे नाव काय ठेवावे? असा प्रश्न नेहमी पालकांना पडत असतो. अनेक लोक मुलांची नावे वेगवेगळे अर्थ असणारी ठेवतात. काही लोकांचे मुलाचे विशिष्ट नाव ठेवण्यामागचे कारण देखील हटके असते. बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मुलाखतींमध्ये सांगत असतात. प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानने मुलाचे नाव आर्यन ठेवण्यामागचे कारण एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
क्रुझ ड्रग्ज प्रकरणी शाहरूखचा मुलगा आर्यन खान सध्या अटकेत आहे. हे ड्रग्ज प्रकरण रोज नवे वळण घेत आहे. त्यामुळे शाहरूख चर्चेत आहे. शाहरूखने सिमि ग्रेवाल यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या मुलाचे नाव आर्यन ठेवण्यामागची गोष्ट सांगितली.
आर्यन नावाची गोष्टएकेदिवशी शाहरूख स्टूडिओमध्ये असताना त्यान आर्यन हे नाव ऐकले. त्यानंतर शाहरूखने आर्यन नावाचे डिझाइन करून त्याची प्रिंट कुटुंबातील सदस्यांना पाठवली. त्यानंतर सर्वांनी मुलाचे नाव आर्यन ठेवण्याचा निर्णय घेतला. आर्यन हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ महान, श्रेष्ठ आणि उच्च असा होतो, असं शाहरूखने मुलाखतीमध्ये सांगितले.
मुलासाठी शाहरूखचे कडक नियमशाहरूखने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, तो त्याच्या मुलाला अशा कोणत्याच सुविधा किंवा अधिकार देणार नाही, जे तो मुलींना देऊ शकत नाही. त्यामुळे शाहरूखने आर्यनला घरात शर्टलेस फिरण्यची परवानगी दिलेली नाही. शाहरूखने सांगितले होते की, जर तुम्हाला मैत्रिणी तसेच आजूबाजूच्या महिलांनी शर्टलेस फिरने मान्य नसेल तर तुम्ही असं कसे समजू शकता की, त्यांना तुम्ही शर्टलेस फिरणे मान्य आहे.
Antim Motion Poster : सलमानने शेअर केलं 'अंतिम' चे पोस्टर, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'शाहरुखकडे 25 कोटींची मागणी, वानखेडेंना 8 कोटी!' क्रूझ केसमधील पंच प्रभाकर साईल यांचा गौप्यस्फोट