एक्स्प्लोर

Star Pravah:TRP च्या शर्यतीत टिकण्यासाठी स्टार प्रवाहची मोठी घोषणा; एक- दोन नाही तब्बल 8 नव्या कोऱ्या मालिका आणणार; दिग्गज कलाकारांची मांदियाळी

महाराष्ट्रच काय भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच एखादी वाहिनी एकाच वेळी एक नाही दोन नाही तर तब्बल आठ नव्या कार्यक्रमांची घोषणा करतेय

Star Pravah New Marathi Shows: साडेपाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणार आहे मनोरंजनाचं नवं आख्यान. स्टार प्रवाहाच्या मालिका त्यातली पात्र ही लोकांना आपल्या घरची वाटतात. आपली आई, मुलगी, भाऊ, वडील, सासू प्रेक्षक आपल्या मालिकांमध्ये शोधतात. त्यामुळेच स्टार प्रवाहला प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळतंय. या प्रेमाची परतफेड होऊ शकत नाही पण मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन आणखीन समृद्ध कसं होईल याची स्टार प्रवाह नेमही काळजी घेत आलंय. महाराष्ट्रच काय भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच एखादी वाहिनी एकाच वेळी एक नाही दोन नाही तर तब्बल आठ नव्या कार्यक्रमांची घोषणा करतेय. पाठराखीण, सुना येती घरा, विसरु नका मला, आमच्या लाडक्या नाईक बाई, मराठी मिडीयम, मी कात टाकली, आता होऊ दे धिंगाणा 5 आणि स्टार प्रवाह गणेशोत्सव अश्या तब्बल 8 कार्यक्रमांची प्रवाह गर्जना नुकतीच करण्यात आली. या खास सोहळ्यात आठही कार्यक्रमांचे कलाकार आणि तंज्ञज्ञ उपस्थित होते.   

पाठराखीण

 ‘पाठराखीण’ ही गोष्ट आहे प्रत्येक संकटात आणि प्रत्येक वेदनेत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं रहाणाऱ्या भाग्यश्री आणि प्राजक्ता या दोन बहिणींची. बहिणींच्या नात्यातील निस्सीम प्रेम, त्याग आणि जिव्हाळा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सुख-दुःखात नेहमी सोबत असणाऱ्या या बहिणींचं आयुष्य मात्र एका अनपेक्षित वळणावर बदलतं. परिस्थिती, समाज आणि नियती यांच्या कसोटीवर त्यांचं नातं कसं टिकून रहातं, याची उत्कंठावर्धक मांडणी या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. ठरलं तर मग, घरोघरी मातीच्या चुली यासारख्या सुपरहिट मालिका देणारी निर्मिती संस्था अर्थात सोहम प्रोडक्शन्स या मालिकेची निर्मिती करत आहे. प्राजक्ता गायकवाड, गौरी इंगवले, शुभंकर तावडे, आशय कुलकर्णी, अदिती देशपांडे, मिताली जगताप, शकुंतला नरे, रमेश वाणी, दीप्ती लेले असे अनेक दिग्गज कलाकार मालिकेत आहेत. विघ्नेश कांबळे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. 

Star Pravah:TRP च्या शर्यतीत टिकण्यासाठी स्टार प्रवाहची मोठी घोषणा; एक- दोन नाही तब्बल 8 नव्या कोऱ्या मालिका आणणार; दिग्गज कलाकारांची मांदियाळी

सुना येती घरा 

नाती जपणं जितकं सुंदर, तितकंच कठीणही असतं. प्रत्येक नव्या नात्यासोबत येतात नव्या अपेक्षा, नवे विचार आणि नव्या स्वप्नांची चाहूल. अशाच नात्यांच्या अनोख्या गुंफणीची गोष्ट घेऊन स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे नवी मालिका ‘सुना येती घरा’. ही मालिका दोन कुटुंबांमधल्या भावनिक संघर्षाची आणि नव्या नात्यांनी घडणाऱ्या बदलांची कथा उलगडणार आहे. अशोक शिंदे, मेघना वैद्य, दीपा परब, शर्मिष्ठा राऊत, सत्यजीत साळोखे, शुभम पडे, सिद्धव साळोखे, मनोज कोल्हटकर असे अनेक दिग्गज कलाकार या मालिकेत आहेत. 

Star Pravah:TRP च्या शर्यतीत टिकण्यासाठी स्टार प्रवाहची मोठी घोषणा; एक- दोन नाही तब्बल 8 नव्या कोऱ्या मालिका आणणार; दिग्गज कलाकारांची मांदियाळी

विसरू नको तू मला 

विसरु नको तू मला एक उत्कट प्रेमकथा आहे. आपल्या प्रेमासाठी कोणत्याही थराला जाऊ शकणारा नायक आणि आपल्या स्वप्नांबरोबर या सच्च्या प्रेमाला सोबत घेऊन जाणारी नायिका यांची ही गोष्ट असणार आहे. तन्वी मुंडले, शाल्व किंजवडेकर,शृजा प्रभुदेसाई, शर्वाणी पिल्लई, राजेंद्र शिसाटकर, सिद्धार्थ खिरिड असे अनेक लोकप्रिय कलाकार मालिकेत आहेत. निर्माते आणि लेखक सचिन दरेकर यांनी मालिकेची कथा लिहिली आहे.

Star Pravah:TRP च्या शर्यतीत टिकण्यासाठी स्टार प्रवाहची मोठी घोषणा; एक- दोन नाही तब्बल 8 नव्या कोऱ्या मालिका आणणार; दिग्गज कलाकारांची मांदियाळी

दोन आघाडीचे दिग्दर्शक घेऊन येणार अनोखी गोष्ट 

चिन्मय मांडलेकर आणि मंदार देवस्थळी या लेखक दिग्दर्शक जोडीने आजपर्यंत अनेक दर्जेदार आणि सुपरहिट मालिका दिल्या आहेत. हीच लेखक दिग्दर्शकाची जोडी आता घेऊन येतेय मराठी अस्मिता टिकवणाऱ्या मराठी मीडियमची गोष्ट. अनेक दिग्गज कलाकार या मालिकेतून भेटीला येतील. 

Star Pravah:TRP च्या शर्यतीत टिकण्यासाठी स्टार प्रवाहची मोठी घोषणा; एक- दोन नाही तब्बल 8 नव्या कोऱ्या मालिका आणणार; दिग्गज कलाकारांची मांदियाळी

अनेक अस्सल मातीतल्या दर्जेदार मालिकांचे लेखक दिग्दर्शक निर्माते आपल्यसाठी घेऊन येतायत आमच्या लाडक्या नाईक बाई ही मालिका. एका सामान्य शिक्षिकेची, तिच्या कुटुंबाची आणि तिच्या मुलींची गोष्ट सांगणारी ही मालिका असणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मालिकेतून आपल्या भेटीला येतील.

Star Pravah:TRP च्या शर्यतीत टिकण्यासाठी स्टार प्रवाहची मोठी घोषणा; एक- दोन नाही तब्बल 8 नव्या कोऱ्या मालिका आणणार; दिग्गज कलाकारांची मांदियाळी

मी कात टाकली 

चमत्कारिक, गूढ, रहस्यमय आणि नाट्यमय कथांचा एक खूप मोठा प्रेक्षकवर्ग आहे. त्यांच्याही मनोरंजनासाठी स्टार प्रवाह सज्ज आहे. आणि म्हणूनच या मनोरंजनाच्या आख्यानात येणारी पुढची मालिका म्हणजे मी कात टाकली. संतोष अयाचित या मालिकेती निर्मिती करणार आहेत. 

Star Pravah:TRP च्या शर्यतीत टिकण्यासाठी स्टार प्रवाहची मोठी घोषणा; एक- दोन नाही तब्बल 8 नव्या कोऱ्या मालिका आणणार; दिग्गज कलाकारांची मांदियाळी

होउ दे धिंगाणा सिझन ५

मालिकांमध्ये कितीही सोशिक, रागीट, प्रेमळ अशी कोणतीही भूमिका असली तरी एक असं ठिकाण आहे जिथे हे सगळे मुखवटे गाळून पडतात आणि प्रत्येक कलाकार कसा धिंगाणेबाज आहे हे जिथे कळतं तो कार्यक्रम म्हणजे आता होऊ दे धिंगाणा. या कार्यक्रमात आता पाचपट मजा येणार पाचपट धिंगाणा होणार. कारण हा असणार आहे आता होउ दे धिंगाणा सिझन ५.

स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२६

भव्य दिव्य सोहळे ही स्टार प्रवाहची खासियत आहे. त्याच साखळीतला पुढचा सोहळा म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगणारा महाराष्ट्राचा लाडका सोहळा यंदा पुन्हा त्याच जोशात साजरा होईल ज्याचं नाव आहे स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२६. तेव्हा आपल्या लाडक्या स्टार प्रवाह वाहिनीवर असंच प्रेम करत रहा.

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Lodhi : आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
Rajpal Yadav : तुझे याआधीचे वर्तन आजिबात विश्वासार्ह नाही, तरीही... राजपाल यादवला सर्वोच्च न्यायालयाची शेवटची संधी
तुझे याआधीचे वर्तन आजिबात विश्वासार्ह नाही, तरीही... राजपाल यादवला सर्वोच्च न्यायालयाची शेवटची संधी
शिक्षक ठेवून 100 टक्के मराठी भाषा शिकणार, अभिनेते संजय दत्तचा यांचा निर्धार, ठाणे जेल, मराठी भाषा ते गणेशोत्सवावरही केलं भाष्य
शिक्षक ठेवून 100 टक्के मराठी भाषा शिकणार, अभिनेते संजय दत्तचा यांचा निर्धार, ठाणे जेल, मराठी भाषा ते गणेशोत्सवावरही केलं भाष्य
Zee Marathi Serial:बाप्पासोबतचं ZEE मराठीवरील कलाकारांचं खास नातं! भावुक करणाऱ्या आठवणी अन् घरच्या परंपरांचा खजिना
बाप्पासोबतचं ZEE मराठीवरील कलाकारांचं खास नातं! भावुक करणाऱ्या आठवणी अन् घरच्या परंपरांचा खजिना

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Lodhi : आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
Embed widget