Sridevi Prasanna Sai Tamhankar : एखादा चित्रपट म्हटले की, भले मोठे कॅमेरे त्यामगाची टीम आपल्या डोळ्यासमोर येते पण सध्याचा जमाना तसा थोडा वेगळा आहे असं म्हणायला हरकत नाही. हल्ली अनेक चित्रपटाच्या सेटवर " नारी शक्ती " अनुभवयाला मिळते. सध्या अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या आगामी " श्रीदेवी प्रसन्न " या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये रमली आहे आणि तिने आज एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये 5 मुली उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत. तिच्या फोटो मधल्या या सगळ्या मुली नक्की कोण ? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. 


सई या फोटो बद्दल सांगताना बोलते "आमच्या सेटवर सण होता आणि सगळे छान पारंपरिक लूक मध्ये आले होते. एक आठवण म्हणून काढलेला हा फोटो तर आहे. पण गंमत म्हणजे या फोटो मधल्या सगळ्या मुली तुम्हाला चित्रपटात एका सीन मध्ये बघायला सुद्धा मिळणार आहेत. या फोटो मधली प्रत्येक स्त्री या चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. डिरेक्शन डिपार्टमेंट , कॉस्ट्यूम डिपार्टमेंट हेड स्नेहा सोबतीला आहे. शिवाय, चित्रपटाची लेखिका अदिती मोघे आणि या चित्रपटाची ऑनलाईन एडिटर अश्या या मुलीची ही खास गोष्ट असलेला हा पॉवर गर्ल फोटो आहे" सई सांगते. सईच्या या पॉवर गर्लची ही खास गोष्ट सेटवर असलेली स्त्री सक्षमीकरण दाखवून देते. चित्रपट कुठला ही असो इंडस्ट्रीत होणार हे स्त्री सक्षमीकरण नक्कीच उल्लेखनीय आहे यात शंका नाही.


सईच्या नव्या सिनेमाची स्टोरी काय आहे?


श्रीदेवी प्रसन्न या सिनेमातील अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदोरकर मुख्य भूमिकेत आहेत. पाहताक्षणी मुलीच्या प्रेमात पडणारा नायक या सिनेमात आहे. मॅट्रिमोनी साइटवर श्रीदेवी नाव असलेल्या मुलीला तो रिक्वेस्ट पाठवतो आणि ती अॅक्सेप्ट देखील करते. सिनेमात पुढे नक्की काय घडते? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सुलभा आर्य, संजय मोने, वंदना सरदेसाई, शुभांगी गोखले, रमाकांत दायमा या कलाकारांनी देखील सिनेमात काम केले आहे. 


2 फेब्रुवारी येणार प्रेक्षकांच्या भेटीला 


सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चोंदोरकर यांची मुख्य भूमिका असलेला श्री देवी प्रसन्न हा सिनेमा 2 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्री देवीच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. चाहते सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या


Sridevi Prasanna : "दिल में बजी गिटार"; सई ताम्हणकर-सिद्धार्थ चांदेकरच्या 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमातील नवं गाणं आऊट