South Cinema : आजच्या काळात साऊथ असो किंवा बॉलिवूड, सगळेजण मोठ्या बजेटचे सिनेमे करत आहेत. पण या चित्रपटांमध्ये कथानकापेक्षा बाकी गोष्टींनाच जास्त महत्त्व दिलं जातं. मोठं बजेट खर्च करूनसुद्धा बॉक्स ऑफिसवर चित्रपट चालेल याची खात्री नसते. पण काही लो बजेट चित्रपट असे असतात की जे अपेक्षेपेक्षा खूप मोठं यश मिळवतात. कोणत्याही मोठ्या स्टारशिवाय, फक्त कथानकाच्या जोरावर हे चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकतात.
साल 2006 मध्ये असाच एक कन्नड सिनेमा आला होता, जिने आपल्या बजेटपेक्षा तब्बल 100 पट कमाई केली. एवढंच नाही, तर ही फिल्म एक वर्षाहून अधिक काळ सिनेमागृहांमध्ये चालली होती.
460 दिवसांचा विक्रम
आपण ज्या कन्नड चित्रपटाबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे ‘मुंगारू मले’. 2006 मध्ये आलेल्या या चित्रपटात कोणतेही मोठे स्टार नव्हते. अभिनेता गणेश आणि पूजा गांधी यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने फक्त कौतुकच केलं. हा चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये पूर्ण एक वर्ष चाललेला पहिला चित्रपट ठरला कारण बेंगळुरूतील पीव्हीआर थिएटरमध्ये तो तब्बल 460 दिवस चालला होता.
फक्त 70 लाखांच्या बजेटमध्ये बनवला होता सिनेमा
‘मुंगारू मले’ फक्त 70 लाखांच्या बजेटमध्ये तयार झाला होता. हा पहिला कन्नड चित्रपट होता ज्याने वर्ल्डवाइड 50 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटाचा एकूण कलेक्शन 75 कोटी इतका झाला, ज्यापैकी 57 कोटी रुपये फक्त कर्नाटकातून मिळाले. यानंतर याचा सिक्वेल 2016 मध्ये प्रदर्शित झाला, पण त्याला पहिल्या भागासारखं यश मिळालं नाही. जवळपास 10 वर्षं ‘मुंगारू मले’ने बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व राखलं होतं. शेवटी ‘केजीएफ 1’ आल्यानंतर त्याचा विक्रम मोडला.
इतर महत्त्वाच्या बातम्या