Manoj Jarange Mumbai Maratha Morcha For Reservation: ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जोरदार शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईत (Mumbai News) दाखल झाले आहेत. मानखुर्द, चेंबूरमध्ये जरांगेचं भव्य स्वागत करण्यात आलं. शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. दुसरीकडे प्रत्यक्ष आंदोलनस्थळ म्हणजे, आझाद मैदानही हाऊसफुल झालं आहे. आंदोलकांचे लोंढेच्या लोंढे आझाद मैदानावर आदळतायत. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिलीये. त्यामुळे मनोज जरांगेंच्या आंदोलनाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. 

Continues below advertisement


मनोज जरांगेंनी आझाद मैदानावर एवटलेल्या शेकडो मराठा आंदोलकांशी संवाद साधला. तसेच, यावेळी त्यांनी सर्व मराठा आंदोलकांना शांत राहण्याचं आणि शिस्त पाळण्याचं आवाहन केलं. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून कुणी हलायचं नाही, असंही मनोज जरांगेंनी सांगितलं आहे. 


मनोज जरांगेंनी आझाद मैदानार पोहोचताच कोणत्या गर्जना केल्यात? 



  1. कोणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही, आंदोलनाला बट्टा लावायचा नाही, मी मरण पत्करायला तयार आहे, पण आता मागे हटायचं नाही...

  2. मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून कुणी हलायचं नाही...

  3. सरकारनं आपल्याला सहकार्य केलंय, आता आपणही सरकारला सहकार्य करावं... समाजाचं नाव खाली जाईल, असं कुणी वागू नका... 

  4. दारु पिऊन धिंगाणा घालू नका, माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल, असं वागू नका... 

  5. मला गोळ्या घातल्या तरी चालतील, पण आता समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही... 

  6. कोण काय सांगतंय, कोण राजकीय पोळी भाजतंय, त्यासाठी कोणी आपल्या आंदोलनाचा वापर करतंय का? हे गांभीर्याने पाहा...

  7. दोन तासांत मुंबई मोकळी करुन द्या, पोलिसांना सहकार्य करा, एकही पोलीस नाराज होणार नाही, याची काळजी घ्या...

  8. मी समाजासाठी मैदानात आलोय,तुमची जबाबदारी पार पाडायची आहे, मोठं आपल्याला आपल्या लेकरा बाळांना करायचंय...

  9. माझा शब्द खाली पडू देऊ नका, मी तुमचा शब्द खाली पडू देणार नाही...

  10. मनोज जरांगे हटणार नाही, ह्याच ठिकाणी उपोषण करून मेलो तरीही, मराठ्यांच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय राहणार नाही... 


दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईची वाट धरली आणि आझाद मैदानावर दाखल होऊन उपोषणाला बसले. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केलंय. जरांगेंसह मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मुंबईत पोहोचले आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.


मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)


1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. 


2. हैदराबाद गझेटियर लागू करा... 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.


3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.


4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या...अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.


5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या..., अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.


पाहा व्हिडीओ : Manoj Jarange Full Speech Azad Maidan : दोन तासात मुंबई मोकळी करा, आझाद मैदानातील पहिलं भाषण