एक्स्प्लोर

Soundous Moufakir Trolled For Performing Hindu Puja: धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीनं पूजा; नेटकऱ्यांनी घेरलं, ट्रोलिंगवर म्हणाली...

Muslim Actress Soundous Moufakir Trolled For Performing Hindu Puja: मुस्लिम धर्म असलेल्या अभिनेत्री सौंदसनं पूर्ण पारंपरिक विधींनुसार पूजा करण्यासाठी एका ब्राम्हणालाही घरी बोलावलं होतं.

Muslim Actress Soundous Moufakir Trolled For Performing Hindu Puja: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि मॉडेल सौंदस मौफाकिर (Soundous Moufakir) सध्या तिच्या 'मोरोमा' (Moroma) या नव्या प्रीमियम स्किनकेअर ब्रँडमुळे चर्चेत आहे. मात्र, ब्रँडच्या लाँचपेक्षा तिच्या घरी आयोजित केलेल्या पूजेमुळे ती अधिक चर्चेत आली आहे. या पूजेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काहींनी तिच्या मुस्लिम धर्माबद्दल प्रश्न उपस्थित केलेत. यावर अभिनेत्रीनं आता उघडपणे प्रतिक्रिया दिलीय.

मुस्लिम धर्म असलेल्या अभिनेत्री सौंदसनं पूर्ण पारंपरिक विधींनुसार पूजा करण्यासाठी एका ब्राम्हणालाही घरी बोलावलं होतं. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती ट्रेडिशनल पिवळ्या रंगाचा ड्रेस वेअर करून आणि हातात पूजेचं ताट घेऊन आरती करताना दिसतेय. या व्हिडीओमध्ये तिच्या टीमचे सदस्यही उपस्थित आहेत. आपल्या नव्या व्यवसायाची सुरुवात शुभ व्हावी, या उद्देशानं या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. हा व्हिडीओ शेअर करताना सौंदसनं लिहिलंय की, ईश्वराचा आशीर्वाद घेऊन तिनं नव्या प्रवासाला सुरुवात केलीय. आपला ब्रँड योग्य दिशेनं वाटचाल करो, संपूर्ण टीम सुरक्षित राहो आणि सर्वांचे हेतू उदात्त असोत, अशी प्रार्थना तिनं केलीय. तसेच, यश कधीही एकट्यानं मिळत नाही, तर ते संपूर्ण टीमच्या कठोर परिश्रमातून आणि विश्वासातून साकार होतं, असंही तिनं नमूद केलंय.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Soundous सुंदूस (@soundousmoufakir)

मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही सोशल मीडिया युजर्सनी प्रश्न उपस्थित केलाय की, मुस्लिम असूनही तिनं हिंदू रितीरिवाजांनुसार पूजा का केली? वाढत्या ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर, सौंदोसनं स्पष्ट केलंय की, तिला मुस्लिम असल्याचा अभिमान आहे आणि तिचा धर्म हा तिच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे.

तिने सांगितले की तिच्या टीममध्ये अनेक हिंदू सदस्य आहेत आणि नवीन उपक्रम सुरू करण्यापूर्वी तिला असे वाटले की तिच्या टीमला या प्रसंगाशी आध्यात्मिकरित्या जोडलेले वाटावे. सौंदस मौफाकिरनं आपली बाजू मांडली आहे. त्यानं नमूद केलंय की, ज्याप्रमाणे तिची टीम तिच्या मुस्लिम धार्मिक कार्यक्रमांचा आणि प्रार्थनांचा आदर करते, त्याचप्रमाणे ती सुद्धा त्यांच्या श्रद्धेचा आदर करते. तिच्या मते, एक चांगली टीम तीच असते जिथे प्रत्येकजण स्वतःच्या धार्मिक श्रद्धा जपून इतरांच्याही श्रद्धांचा आदर करतो.

दरम्यान, सौंदस मौफाकिरला 'MTV रोडिज 2024' (MTV Roadies 2024) मुळे ओळख मिळाली. त्यानंतर तिनं (MTV स्प्लिट्सव्हिला) (MTV Splitsvilla X4) चं विजेतेपद पटकावलं. ती 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 13) मध्येही झळकली आहे. याव्यतिरिक्त, सौंदसनं 'फतेह' (Fateh) आणि 'द केरल स्टोरी' (The Kerala Story) सारख्या प्रोजेक्ट्समध्ये तसेच अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये काम केलंय. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Embed widget