मुंबई : गायक दिलजित दोसांझ जगभरात ओळखलं जातं. वेगवेगळ्या देशांत त्याचे लाखोंनी चाहते आहेत. त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टला त्याचे हजारो चाहते गर्दी करतात. त्याच्या चमकिला या चित्रपटातील अभिनयाला लोकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. असे असतानाच त्याच्या आगामी 'पंजाब 95' या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय. या चित्रपटात सेन्सॉर बोर्डाने एकूण 120 कट करण्याचे निर्देश दिले आहेत.
दिलजिते पोस्ट केले फोटो
दिलजित दोसांझच्या आगामी पंजाब 95 या चित्रपटाचे पोस्टर रिलिज करण्यात आले आहे. खुद्द दिलजितनेही आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर या चित्रपटातील काही फोटो अपलोड केले आहेत. त्याने चित्रपटाचे काही फोटोदेखील अपलोड केले आहेत. हे फोटो आणि पोस्टर पाहून पंजाब 95 चित्रपटाच्या कथेत नेमकं काय आहे? असं उत्सुकतेनं विचारलं जात आहे.
पंजाब 95 चित्रपटाचा फस्ट लुक आला समोर
पंजाब 95 या चित्रपटाचा फस्ट लुक समोर आला आहे. गिलजितने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये त्याला खूप साऱ्या जखमा झाल्याचे दिसत आहे. तसेच त्याच्या चेहऱ्यावरही जखमा आहेत. हा फोटो पाहून त्याचे चाहते वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट जसवंत सिंग खालसा यांच्या जिवनावर आधारीत आहे. याच चित्रपटाला प्रदर्शित करण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांनी एकूण 120 कट देण्याचे निर्देश दिले आहेत. दिलजितने शेअर केलेल्या तीन फोटोंपैकी एका फोटोत दिलजित साधारण कुर्ता आणि पगडी परिधान केलेला दिसतोय. दुसऱ्या फोटोत त्याच्या चेहऱ्यावर रक्त आलेले दिसत असून तो जखमी झालेला दिसतोय. तर दिसऱ्या फोटोत दिलजित दोसांझसोबत दोन छोट्या मुली दिसत आहेत.
चित्रपटाची कथा काय आहे?
पंजाब 95 हा चित्रपट जसवंत सिंग खालसा यांच्या जीवनावर आधारित आहे. ते अमृतसरमध्ये बँकेत मोठ्या हुद्द्यावर होते. पंजाबमध्ये सामाजिक अशांततेच्या काळात शिख तरुणांची हत्या आणि त्यांच्यावर करण्यात आलेले अंत्यसंस्कार याबाबत मोठे सत्य समोर आणले होते. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येचे नेमके कारण काय? तसेच त्यांची हत्या कोणी केली? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यानंतर आता त्यांच्या जीवनावर आधारित पंजाब 95 हा चित्रपट येत आहे. याच चित्रपटातील 120 दृश्य कापण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
हेही वाचा :
शाहरुख, सलमानच्या बॉडीगार्ड्सला खरंच करोडो रुपये पगार मिळतो? पहिल्यांदाच सत्य आलं समोर!